विजेचा धक्का लागून ६ वर्षीय मुलीचा मृत्यू, नेरळ टीवाले हॉटेल समोरील घटना

संदेश साळुंके 

कर्जत रायगड प्रतिनिधी:९०११९९३३३ 

नेरळ : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील खांडा भागातील टीवाले हॉटेलच्या समोरील बाजूस असलेल्या लोखंडी-स्टील या सरबताच्या गाडीला हात लागला आणि त्यात सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आपल्या आईवडिलांसह आईस्क्रीम खात असताना हॉटेल समोरील असलेल्या सरबताचा गाडीला टेकल्यावर अनधिकृत पणे वीज घेतल्याचे समोर येत आह तसेच तो विद्युत प्रवाह बंद न केल्याने सहा वर्षीय रायमिन रफिक खान हिचा म्रुत्यु झाला. 

कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या टीवाले हॉटेलच्या समोर रात्री आईस्क्रीम आणि सरबताची गाडी लागलेली असते. त्या गाडीवर आईस्क्रीम खाण्यासाठी नेरळ पूर्व भागातील साई मंदिर बोपेले येथे राहणारे रफिक खान हे आपल्या कुटुंबासह २० नोव्हेंबर चे रात्री ९.३० नंतर गेले होते. त्यावेळी आईस्क्रीमची गाडीवरील आईस्क्रीमची कोन हातात घेऊन रफिक खान यांचे कुटुंब आईस्क्रीम खात उभे होते. त्या आइसक्रीम गाडीच्या समोरील बाजूस सरबताची नेहमी प्रमाणे गाडी होती. रायमिन हि सहा वर्षाची मुलगी आईस्क्रीम खात असताना तिचा हात त्या सरबताचा गाडीला लागला. सरबताची गाडीवरील सर्व साहित्य रात्रीची वेळ असल्याने बंद होते. मात्र त्या सरबताचा गाडी मधील असलेले शीतपेय यांच्या सोबत फ्रिज याचा वीज प्रवाह रात्री देखील सुरु होता. व हा वीज पुरवठा त्या वीज प्रवाहाचा धक्का सहा वर्षीय मुलीच्या हाताला बसला आणि रायसिन रफिक खान हि त्या सरबताचा गाडीला चिकटवून बसली. त्यानंतर परवीन खान हिला स्थानिक रहिवाशी आणि पालकांनी खेचून काढली. 

त्यानंतर रफिक खान यांनी आपल्या मुलीला त्या अवस्थेत डॉ. शेवाळे यांच्या रुग्णालयात नेले. पुढे प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ येथे नेण्यात आले तेथे डॉक्टरानरांनी रायमिन रफिक खान हिताचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर पालक रफिक खान यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन रायमिन हिच्या मृत्यूस सरबताची गाडी जबाबदार असल्याची तक्रार केली. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी केली आहे. या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाणे येथे ४५/२०२४ नुसार बी. एन. एस. एस. कलम १९४ नुसार गुन्ह्याची नोंद केली असून मयत रायसिन रफिक खान हिच्या मृतदेहचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्ह्याबद्दल पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तर अधिक तपास हे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव दहातोंडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here