श्रीवर्धन आराठी परिसरात नागरिकांचा त्रास शिगेला — कोहिनूर बिल्डिंगजवळ नाल्यातून पाणी रस्त्यावर; ग्रामपंचायतीकडून बेफिकीरी?

99

श्रीवर्धन आराठी परिसरात नागरिकांचा त्रास शिगेला — कोहिनूर बिल्डिंगजवळ नाल्यातून पाणी रस्त्यावर; ग्रामपंचायतीकडून बेफिकीरी?

निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123

श्रीवर्धन आराठी येथील शबीना पेट्रोल पंप शेजारी असलेल्या कोहिनूर बिल्डिंगजवळील नाल्याचे पाणी गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास रस्त्यावर वाहत येत आहे. सतत वाहणाऱ्या या घाणेरड्या पाण्यामुळे वाहनचालक, पायदळ नागरिक, दुकानदार यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्यांना नाक दाबूनच पुढे जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.

नाल्यातील पाणी रस्त्यावर येत असल्याने

वाहतुकीत अडथळे निर्माण होतात

दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरण अस्वच्छ राहते

आजारपणाचा धोकाही वाढत चालला आहे

सामान्य लोकांच्या आरोग्य आणि सोयी-सुविधांकडे असे दुर्लक्ष का केले जाते? ही समस्या मुद्दाम रखडवली जाते आहे का? असा प्रश्नही आता नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

स्थानिकांनी प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले असून, समस्या तत्काळ निवारण न झाल्यास मोर्चा किंवा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.

स्थान — आराठी, श्रीवर्धन
समस्या — नाल्याचे पाणी रस्त्यावर
नागरिकांची मागणी — तात्काळ स्वच्छता व दुरुस्ती