अभिरूप युवा संसदेत भंडाऱ्यातील स्वप्नपूर्ती फॉउंडेशनला प्रोत्साहनपर पुरस्कार”. “पुन्हा एकदा मुंबई मध्यवर्ती सभागृहात कमल साठवणे यांचा आवाज गुंजणार”

60

अभिरूप युवा संसदेत भंडाऱ्यातील स्वप्नपूर्ती फॉउंडेशनला प्रोत्साहनपर पुरस्कार”.
“पुन्हा एकदा मुंबई मध्यवर्ती सभागृहात कमल साठवणे यांचा आवाज गुंजणार”

 

अभिरूप युवा संसदेत भंडाऱ्यातील स्वप्नपूर्ती फॉउंडेशनला प्रोत्साहनपर पुरस्कार". "पुन्हा एकदा मुंबई मध्यवर्ती सभागृहात कमल साठवणे यांचा आवाज गुंजणार"
अभिरूप युवा संसदेत भंडाऱ्यातील स्वप्नपूर्ती फॉउंडेशनला प्रोत्साहनपर पुरस्कार”.
“पुन्हा एकदा मुंबई मध्यवर्ती सभागृहात कमल साठवणे यांचा आवाज गुंजणार”

✍मुकेश मेश्राम ✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी :-नागपूर मध्ये युवक बिरादरी व एबीपी माझा चा संयुक्त विद्यमाने आयोजित अभिरूप युवा संसद कार्यक्रम धनवटे कॉलेज नागपूर येथे पर पडले. या स्पर्धेत विदर्भात अनेक चमूनि सहभागी होऊन नावीन्य कडे वाटचाल करण्याचा पर्यन्त केले. या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना लोकशाही व सभागृहात होणारे बदल व नेमके काय घडले जाते याचे स्वरूप समजवणारी ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये भंडाऱ्यातील स्वप्नपूर्ती फॉउंडेशन च्या चमुदेखील सहभागी झाले होते व प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले.

अभिरूप युवा संसदेत सभापती भूमिकेत मेघा मिश्रा,प्रधानमंत्री स्वरूपात प्रज्वल निंबार्ते व तसेच विरोधी पक्ष नेते कमल साठवणे यांनी भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे शुभम तिचकुले, मृणाल साकुरे, वैष्णवी खांगरे, स्नेहा बोन्द्रे, दीपक गुल्लानी,सुशिल निनावे,अजय भैसारे सत्तापक्ष नेते म्हणून भूमिका साकार केली. त्याचबरोबर विरोधी पक्ष खासदार भूमिकेत राखी देशमुख, साकिब खान, योगेश शेंडे, श्वेता डोंगरे, नेहा डोकरीमारे,सूर्यकिरण पारधी याचा समावेश होता.
यामध्ये “शिक्षा नीती सुधार प्रणाली ” या विषयावर बिल सत्ता पक्षा द्वारे ठेवून ते पारित करण्यात आले. या कार्यक्रमात पक्ष व विरोधी पक्षाद्वारे अनेक प्रश्नोत्तर करण्यात आले व नंतर बिल पारित करण्यात आले.

या नंतर सर्व टीम मधून पारितोषिक देण्यात आले व यात उत्कृष्ट संसदपटू म्हणून टीम मधील कमल साठवणे यांची निवड करण्यात आली, परत एकदा कमल साठवणे यांची आवाज संसद भवनच्या मध्यवर्ती सभागृहात गुंजणार. उत्तम प्रतिसाद देण्यात आले.

*प्रतिक्रिया*
अतिशय अप्रतिम असा अनुभव राहिलेलं आहे माझा या कार्यक्रमाबद्दल, एक सर्वसाधारण वेक्तिमत्व म्हणून विधान भवनाच्या सेंट्रल हॉल मधून आपले मत मांडणे ही एक स्वतःत खूप मोठी बाब आहे. व माझा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.आणि मला परत एकदा ही संधी प्राप्त झाली यासाठी मी माझा समस्त टीम चे आभार मानतो व माझ्या सारख्या युवा पिढीला राजकारण समजावण्याच्या व लोकशाही प्रणाली बद्दल मार्गदर्शन देणाऱ्या या उपक्रमासाठी मी युवक बिरादरीचा खूप खूप आभारी आहे..

*कमल साठवणे*