तंटामुक्ती अध्यक्षने पकडली अवैध दारू दिघोरी येथील प्रकरण

58

तंटामुक्ती अध्यक्षने पकडली अवैध दारू

दिघोरी येथील प्रकरण

तंटामुक्ती अध्यक्षने पकडली अवैध दारू दिघोरी येथील प्रकरण
तंटामुक्ती अध्यक्षने पकडली अवैध दारू
दिघोरी येथील प्रकरण

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी :-लाखनी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दिघोरी/नान्होरी येथेल तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र लामकांने यांनी आज सकाळी देवलाबाई दांडेकर हे अवैध दारू व्यवसाय करीत होते. या दारू व्यवसायामुळे गावातील जनता त्रस्त झाली होती. गावातील नवयुवक दारूच्या आहारी जात होते .गावातील झगडे भांडणे मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. हे बघता गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र लामकांने यांनी स्वतःच्या पुढाकाराने अवैध दारू विक्रेता देवलाबाई दांडेकर यांच्या घरी जाऊन देशी दारूच्या 30 प्लास्टिक बॉटल (99 ml) पकडल्या याच्यां पकल्या आणि रितसर तक्रार करण्याकरिता तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र लामकांने यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून लाखनी पोलीस स्टेशन कळविले. माहिती मिळताच लाखनी पोलीस स्टेशन चे पोलीस सह फौजदार श्री बागडे व त्यांचे सहकारी दिघोरी /नान्होरी येथे आले . तंटामुक्ती अध्यक्षांच्या तक्रारीनुसार अवैध दारू विक्री देवलाबाई खांडेकर हिला अटक करण्यात आली असुन . महाराष्ट्र दारूबंदी कलम 65(E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाखनी पोलिस स्टेशनचे सह. फौजदार बागडे करीत आहेत.