एकेकाळी तिथे घाणीचा दुर्गंध; आता पसरणार ज्ञानाचा सुगंध भानापेठ वॉर्ड येथे अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

57

एकेकाळी तिथे घाणीचा दुर्गंध; आता पसरणार ज्ञानाचा सुगंध

भानापेठ वॉर्ड येथे अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

एकेकाळी तिथे घाणीचा दुर्गंध; आता पसरणार ज्ञानाचा सुगंध भानापेठ वॉर्ड येथे अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन
एकेकाळी तिथे घाणीचा दुर्गंध; आता पसरणार ज्ञानाचा सुगंध
भानापेठ वॉर्ड येथे अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

चंद्रपूर : – भानापेठ वॉर्डातील जुन्या वस्तीत नागरिकांच्या सेवेसाठी स्वच्छतागृह होते. कालांतराने प्रत्येक घरी शौचालय आले. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहात येणाऱ्यांची संख्या नाहीच्या बरोबरीत झाली. शिवाय स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे शेजारील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत होता. त्यामुळे येथे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून अभ्यासिका साकारण्यात आली. एकेकाळी घाणीचा दुर्गंध असलेल्या जागी आता ज्ञानाचा सुगंध पसरणार आहे.

भानापेठ प्रभाग 11 तील अंचलेश्वर वॉर्ड येथे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या जुन्या स्वच्छतागृहाच्या जागेवर अभ्यासिकेचे बांधकाम करण्यात आले. या अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे उद्घाटन माजी वित्त मंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रविवारी (ता. १९) झाले.

यावेळी महापौर राखीताई संजय कंचर्लावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सभागृह नेते देवानंद वाढई, महिला व बालकल्याण समिती उपसभापती शितल कुळमेथे, नगरसेवक संजय कंचर्लावार, प्रकाश धारणे यांची उपस्थिती होती.

लोकार्पण सोहळ्यात महापौर राखी कंचर्लावार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शिल्पचित्राची बांबूपासून साकारलेली प्रतिकृती भेट देऊन स्वागत केले.

भानापेठ वॉर्डातील अंचलेश्वर वस्तीतील जुन्या स्वच्छतागृहामुळे दुर्गंधी पसरून आरोग्य बिघडत असल्याच्या तक्रारी स्थानीक नागरिकांनी नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्याकडे केल्या. तसेच मोकळ्या जागी क्रीडांगण निर्माण करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी या जागी नागरिकांच्या आग्रहास्तव अभ्यासिका बांधकाम करण्याची मागणी मनपाकडे केली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या जागी अभ्यासिकेचे बांधकाम केले. आणि त्यासमोरील मोकळ्या जागी खेळाचे मैदान तयार करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रविवारी (ता. १९) पार पडला. या अभ्यासिकेचा उत्तम उपयोग करून तरुणाच्या हातून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून देशसेवा घडेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.