लखमापूर येथील आदिवासी महिला व पुरुष मजुरांना मारहाण प्रकरणी पाचोरा एकलव्य संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले

57

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067

आज दिनांक २२ डिसेंबर २०२१ वार बुधवार रोजी एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती आज जळगांव जिह्यातील पाचोरा येथिल पोलीस निरीक्षक यांना एकलव्य संघटनेच्या वतीने दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील लखमापुर येथे निंदनीय घटना घडली शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत यांनी मिळून नियमावली करण्यात आली होती की, आदिवासी शेतमजुर आपल्याकडे कमी मजुरीवर कामावर आले नाही तर त्यांच्यावर पुर्ण गावातुन सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असे लेखी पत्र काढुन व जे काही आदिवासी महिला दुसऱ्याकडे कामाला जात असतांना सर्व मजुर वर्गाला काही संवर्ण धनदांडग्या लोकांनी रस्त्यात अडतून तुम्ही दुसरीकडे कामाला जाऊ नका, गेले तर तुम्हाला गावात राहु देणार नाही. व त्या ठिकाणी आदिवासी महिलांना संबंधीत जमावाने मारहाण करून आदिवासी समाजात दहशतीचे वातावरण तयार करणाऱ्या लोकांवर व लेखी पत्र काढणाऱ्या ग्रा.पं.पदाधिकारी, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक सरपंच यांच्यावर देखील आदिवासी भिल समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून सामाजिक बहिष्कार अधिनियम २०१६ कायद्या अंतर्गत कारवाई करून आदिवासी समाजाला न्याय मिळावा व येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाहीत. करीता शासनाकडून कायद्यांची अंमलबजावणी सक्तीने करावे असे निवेदन पाचोरा पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी निवेदन देतांना एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब जळगांव जिल्हाध्यक्ष (जळगांव लोकसभा) मा.संजुबाबा युवा जिल्हाध्यक्ष मा.रविभाऊ सोनवणे जिल्हा संपर्क प्रमुख मा.रोहिदास जाधव पाचोरा तालुकाध्यक्ष मा.गणेश वाघ युवा जिल्हा कार्याध्यक्ष मा. समाधान जाधव पाचोरा तालुका मार्गदर्शक मा.रमेश मोरे सर शहराध्यक्ष मा.पिंटू मोरे तालुका सल्लागार मा.बबन मोरे मा. रमेश ठाकरे युवा उपाध्यक्ष मा. राहूल ठाकरे तसेच एकलव्य संघटनेचे पाचोरा तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.