उमरेड रस्त्यावर एका पाच वर्षाच्या मुलाला भरधाव वेगात असलेल्या खासगी बसने चिरडले

47

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : नागपुरात बुधवारी सकाळी वर्दळीच्या उमरेड रस्त्यावर एका पाच वर्षाच्या मुलाला भरधाव वेगात असलेल्या खासगी बसने चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने बसवर दगडफेक केली आणि बसचे नुकसान केले आहे.
उमरेड रोडवरील पांडव कॉलेजसमोर हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुभम साजन काकडे असे मृताचे नाव असून तो परशेओनी येथील रहिवासी आहे. या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जमावाला केलं शांत केलं. तर, पुढील तपास सुरू आहे.