वातावरण बदलामुळे रुग्णात झाली वाढ ‘ सर्दी खोकला तापाचे प्रमाण वाढले.

54
वातावरण बदलामुळे रुग्णात झाली वाढ ' सर्दी खोकला तापाचे प्रमाण वाढले.

वातावरण बदलामुळे रुग्णात झाली वाढ ‘ सर्दी खोकला तापाचे प्रमाण वाढले.

वातावरण बदलामुळे रुग्णात झाली वाढ ' सर्दी खोकला तापाचे प्रमाण वाढले.

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा जिल्ह्यात गत चार ते पाच दिवसापासून तापमान पारा घसरत आहे. या अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याचे सर्वाधिक परिणाम मात्र लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर होत आहे. वाढत्या थंडीमुळे खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्दी खोकला आणि तापाचे उपचारासाठी रुग्ण येत आहेत.
थंडीच्या मौशममध्ये सर्दी आणि खोकल्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. घसा खवखवणे , ताप येणे , कान दुखणे असे दररोज रुग्ण हे रुग्णालयात येत आहेत. लहान मुलांमध्ये थंडीच्या दिवसात कफाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसापासून लहान मुलांना वफारा देण्यासाठी रुग्णालयामध्ये पालक हे आपल्या मुला मुलींना उपचारासाठी घेऊन जातांना दिसत आहे. रुग्णालयातील औषध उपचाराने रुग्णही बरे होतांना दिसत आहे. तसेच लहान मुलांच्या आहारात गरम पदार्थांच्या समावेश करावा अशी बालरोग तज्ञ अमित कावडे यांनी सांगितले आहे.
वातावरणात बदल झाल्याने व थंडी जास्त पडत असल्याने रुग्णांमध्ये डोके दुखणे , जेवण न होणे , पेशी कमी किंवा जास्त होणे , टायफाईड किंवा डेंग्यू, कावीळ असे आजार रुग्णांना व्हायरलमुळे जाणवतात. वेळीच उपचार केले तर रुग्णांना दोन-चार दिवसात आराम मिळतो. अशा वेळेस रुग्णांनी वेळेवर पोटभर जेवण करावे. तळलेले ,उघड्यावरचे, शिळे अन्नपदार्थ खाण्यास टाळावेत. जास्त प्रमाणात पाणी प्यावे. आणि सकस आहार घ्यावा असे असे बालरोग तज्ञ अमित कावडे यांनी सांगितले आहे.