राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 5 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 5 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 5 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त

देवेंद्र भगत✒️
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
📱8275348920

अमरावती, दि. 22.12.2023 : राज्य उत्पादन शुल्क, अमरावतीव्दारे विशेष मोहिमेंतर्गत हातभट्टी दारु वाहतूक व मोहा फुलांची अवैध वाहतुक प्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत हातभट्टी दारु व मोहाची फुले गोण्यासह 5 लक्ष 61 हजार 360 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारुबंदी कायदानुसार गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक यांनी दिली.

आगामी नाताळ सण, नविन वर्षाच्या पार्श्वभुमीवर तसेच बहिरम यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने गावठी हातभट्टी दारु निर्मीती, विक्री, वाहतुक संदर्भात विशेष मोहिमेंतर्गत मध्यप्रदेश सीमालगत भागात गस्त लावून दि. 20 डिसेंबर रोजी आरोपी संतोष रमेशराव शेवतकर, तसेच रेडवा ते घाटलाडकी रोडवर सुरेश रामराव राठोड यांच्या ताब्यातुन एक दुचाकी मोटर साईकलसह 60 लि. गावठी हातभट्टी दारु वाहतुक करताना जप्त करुन गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच दि. 21 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सालबर्डी ते मोर्शी रोडवर मोर्शी तालुक्यातून मोह फुलांची अवैध वाहतुक होत असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार संशयित वाहनांची तपासणी करीत असताना धम्मपाल साहेबराव चौकीकार, रा. सालबर्डी पो. मासोद ता. मुलताई जि. बैतुल व शेख कलीम शेख करीम, ता. मोर्शी जि. अमरावती यांच्या ताब्यातुन एक महिन्द्रा बोलेरो पिकअप चारचाकी वाहन व अंदाजे 40 किलो. क्षमतेची एकुन 75 गोणी(पोते) पुर्णपणे मोहा फुलाने भरलेले त्यात एकुण 3 हजार किलो मोहाची फुले गोण्यासह मिळाली. त्याची एकुण किंमत 5 लक्ष 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष मोहिमेमध्ये 5 लक्ष 61 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क, अमरावती विभागाचे विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ, व अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदशनाखाली राबविण्यात आली. यावेळी विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुरज दाबेराव, दुय्यम निरीक्षक डॉ. सचिन मेश्राम, दुय्यम निरीक्षक एकनाथ शेजुळ, जवान बजरंग थोरात, पंकज भारती, महेश म्हैसकर, व वाहनचालक संजय देहाडे यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here