मुलं आणि मोबाईल?

48
मुलं आणि मोबाईल?

मुलं आणि मोबाईल?

मुलं आणि मोबाईल?
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞
आजकाल प्रत्येक ठिकाणी शाळेत घरात बाहेर रस्त्यावर सगळीकडे एक वाक्य सतत ऐकायला मिळतं. आजकालची मुलं मोबाईलच्या आहारी गेलेत नक्कीच पण खरंच फक्त यामध्ये मुलांचा दोष आहे का?
थोडा विचार करून बघूया,आजकाल लग्न बऱ्याच उशिरा केली जातात त्याच्यामुळे गरोदरपणासाठी बऱ्याचशा अडचणी येतात परिणामी मूल व्यवस्थित राहावं यासाठी बेड रेस्ट घ्यायला सांगितली जाते याचा परिणाम असा होतो की आई दिवसभर मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही याच्या आहारी जाते परिणामी मुलाच्या ही सतत गर्भामध्ये असताना याचाच परिणाम होतो. काही दिवसांनी बाळ बाहेर येतो जग बघतो जसं बाळ गर्भातून बाहेर येत त्याचप्रमाणे त्याचे फोटो काढले जातात स्टेटस ठेवले जातात वेलकम साठी त्याचे वेगवेगळे व्हिडिओज केले जातात पुन्हा मोबाईल त्यानंतर बाळ थोडं मोठं होतं त्याला अंगाई गीतही मोबाईलवर ऐकवलं जातं त्यानंतर बाळ थोडा मोठा झाला की त्याला हातामध्ये त्याच्या फोन दिला जातो त्याला एबीसीडी ऐकण्यासाठी दिला जातो काही दिवसांनी बाळ प्ले ग्रुप, नर्सरी अशा वर्गांमध्ये जाऊ लागतो आणि बाळ स्वतःचे मोबाईल चालवू लागत. जसे हे छोटा बाळ मोबाईल घेऊन चालवू लागतं प्रत्येकाला त्याच कौतुक वाटतं. त्याबाबत त्याचं कौतुकही केलं जातं बाळाला फोन व्यवस्थित चालवता येतो म्हणून बाळासाठी एक वेगळा फोनही घेतला जातो. आता हेच बाळ हळूहळू मोठं होऊन मुलांमध्ये त्याचं रूपांतर कधी होतं कळत नाही आणि मग मात्र सगळ्यांचा गोंगाट सुरू होतो की मुलं फोनच्या आहारी गेले मुलं टीव्हीच्या आहारी गेलेत मुले लॅपटॉपच्या आहारी गेलेत. प्रत्येकाला महाभारतातील कथा माहित आहे अभिमन्यू ने चक्रव्यू मध्ये भेद करून आत प्रवेश केला. मात्र माता झोपी गेल्यामुळे त्याला तो चक्रव्यु कसा भेदायचा हे काही कळालं नाही आणि तो काही बाहेर येऊ शकला नाही परिणामी तो मृत्यूमुखी पडला आजकाल आजकालच्या मुलांना मोबाईल मध्ये प्रवेश करायचा माहिती आहे पण त्याचा भेद करायचा मात्र माहिती नाही आणि याचा परिणाम काय होईल हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. मुलांना मोबाईलची सवय लागली नाही ती लावली जाते अगदी गर्भात असल्यापासून ते प्रत्येकाने हा विषय थोडा विचार करावा आणि स्वतःही मोबाईल पासून लांब राहावं आणि मुलांनाही लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा. लेख आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. सौं.नीलम मिलिंद थवई. राहणार नेरळ 📞9527020171