आरोग्य सुरक्षेसाठी अल्कालाईन पाण्याचा वापर करा–डॉ.जयपाल पाटील     

35

रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांचे हस्ते अल्कालाईन वाॅटर संचाचे उद्घाटन 

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्युरो चीफ

९४२०३२५९९३

अलिबाग:- शेतकऱ्याची आपल्या शिवारात असलेले शेतघर, गाई-म्हशीचा गोठा,नारळ, आंबा बागायत यांच्या जेव्हा आग लागून अतोनात नुकसान होते.यासाठी शेताच्या सभोवार बांधा पासुन आपल्या शेताकडील बाजूस जेसीपी लावुन 5 फुट खोल चर खणून घ्यावा काढलेल्या मातीवर बहुगुणी शेवगा, नारळ,हापूस आंबे लावुन अथिँक उन्नती करावी व आगीमुळे होणारी आपत्ती थांबवावी असे मार्गदर्शन डेस्टिनीशन फॉरेस्ट अँग्रो टुरिस्ट सेटंर,सांबरीने आयोजित शेतकरी मेळाव्यात छत्रपती शिवाजीमहाराज लोक विद्यापीठ अमरावतीचे राष्ट्रीय संचालक, रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.

   प्रारंभी डॉ.जयपाल पाटील यांचे हस्ते अल्कालाईन वाॅटर संचाचे ऊदघाटन करण्यात आले .डॉ.जयपाल पाटील यांचा परिचय सागरगड शेतकरी संघाचे सचिव रोहीत पाटील यांनी करुन दिला.यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्याते प्रफुल्ल पाटील, जिल्हा परिषद रायगड, संयुक्ति सनव्हिरो पुणेचे मालक तुषार जगदाळे, कंत्राटदार जोशी, नवेनगर,वायरमन नरेंद्र ठाकूर, आवेटी,गंवडी विजय पाटील, सांबरी, सागरगड शेतकरी महासंघाचे मोहन विठ्ठल पाटील. खजिनदार, सदाशिव बाळाराम म्हात्रे. शशिकांत नारायण पाटील उपाध्यक्ष मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये मेळावा आयोजक प्रगतिशील शेतकरी संतोष पाटील म्हणाले आमच्या शेतावर कृषी पर्यटन मधे 100 रुपयात पोटभर शाकाहारी व मांसाहारी जेवण,15 हजार रुपयांपर्यंत,निवास, चहा,नाश्ता, भोजन वृध्दाश्रम,आणी आरोग्य दायक अल्कालाईन पाणी जनतेसाठी अल्प दरात उपलब्ध करीत आहोत. यांनंतर डॉ.जयपाल पाटील यांनी शेतकऱ्यांनी आपली शेतकरी नोंद करून घेणे आवश्यक असून पुढे केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना मिळतील, वर्षभर आपल्या जमिनीनुसार किसान क्रेडिट कार्ड वर वर्षभर बिनव्याजी पैसे वापरास मिळतात ते काढुन घ्यावे, प्रत्त्येक शेतावर गमबुट चा वापर सुरक्षे साठी करावा,त्यामुळे साप,विचुं चावणार नाहीत चुकून चावलाच तर108 रुगणवाहिकेस बोलावून जिल्हा रुग्णालयात नेणे, आपल्या लग्न होऊन बाळंतपणास माहेरी आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषद आरोग्य खात्याची 102 क्रमांक मोबाईल लावताच अर्धा तासात आपल्या घरापर्यंत येते तर महिला सुरक्षेबाबत महाराष्ट्र पोलीस 112क्रमांक वर संपर्क साधून सुरक्षित रहावे असे सांगितले. अशोक डाऊर, सांबरी,अनिकेत म्हात्रे, सांबरी खिंड यांनी मेळावा यशस्वी करण्यास मदत केली.शेवटी आभार राजा पाटील यांनी मानले.