किल्ले धारूरच्या नगर परिषद अध्यक्ष पदी बालासाहेब जाधव यांची निवड 

60

अजित पवार गटाला नगराध्यक्षपदासह 11 नगरसेवकाना मतदाराची पसंती

धनंजय कुलकर्णी

बीड (वा ):-धारूर नगरपरिषद नगरअध्यक्ष व नगरसेवक पदासाठी ची निवडणूक न 2025चा निकाल आज जाहीर झाला या निवडणुकीत अतिशय चूरशिच्या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाने बाजी मारत नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार बालासाहेब जाधव 11नगरसेवक सोबत घेऊन विजयी झाले आहेत. अध्यक्ष पदासाठी त्यांच्या समोर दिग्गज उमेदवार भाजपा कडून रामचंद्र निर्मळ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मा. नगरध्यक्ष अर्जुन गायकवाड उभे होते. या दोन्ही मातबर नेत्यांचा त्यांनी पराभव करत 666मत अधिकची घेऊन स्वतः कडे विजय खेचून आणला व सोबत 11नगरसेवकाना विजयाची माळ घातली बालासाहेब जाधव यांनी भारतीय जनता पार्टीतून नुकताचा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला होता निवडणुकीच्या सुरुवाती पासूनच त्यांनी आपली प्राचाराची धुरा व्यवस्थित सांभाळून मा. प्रकाश दादा सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक पदासाठी चांगल्या उमेदवाराची एक टीम सक्रिय करून प्रचार सुरु केला

स्वतः ला मागील काळातील राजकीय वारसा व नगरसेवक पदाचा अनुभव यांचा त्यांना या निवडणुकीत नक्कीच फायदा झाल्याचे दिसत आहे.

त्यांना निवडणुकीच्या सुरुवातीपासून सर्व सामान्य मतदाराची साथ होती. मागील वर्षात एक भाजपा नगरसेवक व साधा कार्यकर्ता संयमी व धारूर शहराचा परिपूर्ण अभ्यास असलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती मात्र भाजप कडून त्याना बाजूला ठेवण्याचे काम होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आ. प्रकाश दादा सोळुंके यांच्या कडे जाण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून आपली नगरध्यक्ष पदाची जागा पक्की केली व यांची पूर्ण खात्री प्रकाश दादा यांनी ओळखून आलेल्या संधीचा फायदा करून घेत बालासाहेब जाधव यांना जनतेतून अध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची संधी दिली व आपल्याकडे धारूर नगरपरिषद ठेवण्यात ते यशस्वी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

शहरातील मतदारांनी त्यांना पसंती दिल्यामुळे त्यांची जबाबदारी आता वाढली आहे कारण शहरातील मागील काही वर्षात पिण्याच्या पाण्याची समस्या खुप गंभीर होती हा प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे ते त्यांना पूर्ण करावे लागणार आहे शहरातील रस्ते. नाल्या.लाईट मतदाराच्या सर्व मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे द्

देऊन जनतेचा विश्वास त्यांना संपादन करावा लागनार आहे. मतदारांना नगरध्यक्ष पदाचा नवीन चेहरा त्यांच्या रूपात पाहायला मिळणार आहे त्याना पूर्वीच्या नगरसेवक पदाचा कामाचा अनुभव त्यांच्याकडे आहे त्या मूळे मतदारांनी त्याना व त्यांच्या गटाला प्रथम पसंती दिली आहे नवीन चेहऱ्याच्या नगरसेवक यांना सोबत घेऊन त्यांना पारदर्शक व्यवहार करून पुढील शहराच्या विकासाची कामे करावी लागणार आहेत त्यांच्या कडून सर्व सामान्यांना मतदारांना अपेक्षा आहे विकासाची कामे भरभराटीने होतील व एक धारूर स्वच्छ व सुंदर शहर पुढील काळात दिसेल असा विश्वास सर्व शहरातील नागरिकांना आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकड एकूण नगरसेवक पदासाठी 20 उमेदवारापैकी 11 नगरसेवक विजयी होऊन बालासाहेब जाधव यांची जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले.