जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरनेतून वनराई बंधारे बांधकाम हे बहुद्देशीय – तालुका कृषी अधिकारी ललन राजपूत यांचे मत

19

जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरनेतून वनराई बंधारे बांधकाम हे बहुद्देशीय – तालुका कृषी अधिकारी ललन राजपूत यांचे मत

गोंदिया दि 20 डिसेंबर 

जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरनेतून संपूर्ण राज्यात रामानंदाचार्य संप्रदायच्या वतीने राज्यभर हजारो वनराई बंधारे बांधकाम सुरु असल्यामुळे जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण याशिवाय हे उपक्रम बहुद्देशीय आहे. असे मत गोरेगाव तालुक्यातील जाणाटोला येथे संप्रदायाच्या वतीने वनराई बंधारे बांधकामाला प्रत्यक्ष भेट देतानी तालुका कृषी अधीकारी ललन राजपूत यांनी व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या की श्रमदानातून वनराई बंधारे बांधकाम यामुळे सिंचनासह, पशु पक्षी, जनावर यांची तहान भागणार. याशिवाय परिसरातील पाण्याची पातळी वाढीस येणार आहे. माती धूप कमी होणार एकंदरीत हे उपक्रम बहुद्देशीय असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी रामानंदाचार्य संप्रदाय कडून त्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कृषी सहायक तरोने, कृषी सहाय्य्क सार्व्हे, तालुका अध्यक्ष मुन्नीलाल नाईक, जी डी मेजर गिरधारी जमइवार, पूर्व जी डी मेजर येळे, जिल्हा युवा अध्यक्ष, कैलास खिरेकर, देणगी प्रमुख, पंकज खांडवाये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय चन्ने, पाथरी सेवा केंद्र अध्यक्ष, रवी पंजारे, चिलेश भोयर,चाकाटे सह मोठया संख्येने सांप्रदायिक महिला पुरुष मंडळी उपस्थित होते.