कर्मयोगी गाडगेबाबांचे विचार घेऊन विद्यार्थ्यांनी कृतीशील व्हावे—डॉ हनुमंत सौदागर

22

भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयात संत गाडगेबाबा स्मृतीदिन साजरा

केज: (प्रतिनिधी): संत गाडगेबाबांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. विचारातून कृतिशीलता जपावी असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते शहरातील भाऊसाहेब पाटील अध्यापक(बी एड) महाविद्यालयात संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ हनुमंत सौदागर, प्रमुख पाहुणे सरस्वती महाविद्यालयाती प्रा डॉ हरिदास शिंदे हे विचारपीठावर उपस्थित होते. प्रा बलाढये यु बी ,प्रा कचरे जे एस, प्रा लुंगारे एस आर,प्रा जगदाळे एम एच,प्रा चोले एन जे ,ग्रंथपाल संतोष साळवी सुजीत नाईकवाडे यांची होती.

यावेळी बोलतांना डॉ सौदागर म्हणाले संत गाडगेबाबा हे मानवतावादी संत होते जीवनभरात सेवेचा वसा घेऊन दिवसभर गावातील घाण साफ करून रात्री लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची घाण साफ करण्याचे कार्य त्यांनी केले.

समाजसेवा सर्वश्रेष्ठ असल्याचा विचार त्यांनी दिला. त्यांच्या विचारातून देश घडत आहे.असे मत व्यक्त केले.छात्रअध्यापक परशुराम कचरे,शेख राहील या विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरविंद गायसमुद्रे,सतीश नेहरकर, यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.