कौटुंबिक वादातून पत्रकार विजय दुंदरेकर व त्यांच्या कुटूंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी
संजय कदम
पनवेल: कौटुंबिक वादातून पत्रकार विजय दुंदरेकर व त्यांच्या कुटूंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विजय दुंदरेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
या संदर्भात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार देणारे विनय दुंदरेकर यांनी सांगतिले की, नुकतेच त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद घटना घडली होती. यावेळी उत्तरकार्य कधी करायचे याबाबत त्यांच्या कुटुंबीयांची चर्चा होत असताना त्यांच्या कुटुंबियांमध्ये वादविवाद झाले यावेळी त्यांच्या कुटुंबियातील आदित्य दुंदरेकर याने शिवीगाळ करून त्यांना मारण्यासाठी धावला यावेळी आदित्यने बाजूलाच पडलेला लाकडी दंडका उचलून यांच्या विनय दुंदरेकर यांच्या डोक्यात मारला त्यात ते गंभीर जखमी झाले होते. यावेळी सचिन पाटील व किशोर भगत हे सुद्धा आदित्यच्या मदतीला उभे राहिले होते. यावेळी त्यांनी दुंदरेकर कुटुंबियांना धमकावून तुमचा कार्यक्रम लवकरच करतो अशी धमकी दिली. तसेच अनंत दुंदरेकर यांनी सुद्धा विजय दुंदरेकर यांच्या पाठीवर लाकडी बॅटने मारहाण केली.
या संदर्भात पत्रकार विजय दुंदरेकर व त्यांचा मुलगा विनय दुंदरेकर, गीता दुंदरेकर, यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु या तक्रारीची योग्य ती दखल पोलिसांकडून घेतली जात नसल्याचे दुंदरेकर कुटुंबियांचे म्हणणे आहे. तरी याबाबत या चौघांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये विजय दुंदरेकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांना सुद्धा निवेदन दिल्याचे दुंदरेकर कुटुंबीयांनी सांगितले आहे.









