परभणीत भाजपा मोठा पक्ष, दोन ते तीन दिवसात निर्णय
सदाशिव राऊत
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी: महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ची निश्चित च येती होईल तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास ज्या ठिकाणी शक्य असेल तर त्यांनाही सोबत घेतले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीत पत्रकारांशी हितगुज साधताना माहिती दिली.
या महापालिका निवडणुकीत युतीस दोन तृतीयांश बहुमत मिळेल म्हणजे 51% मतदान युतीस मिळेल, असा मोठा विश्वास महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रकट करतेवेळी परभणीकर हे विकसित परभणी करिता भारतीय जनता पार्टी युतीसह महायुतीच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. महायुतीत तेरा पक्ष आहेत राज्यात सर्वत्र महायुती व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत विशेषत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांनी युती बाबत स्पष्ट असे संकेत दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे या युतीत सहभागी होऊ शकतात, परंतु काही महापालिकेतील जागा व इच्छुकांची संख्या या गोष्टीची समीकरणे तारेवरची कसरत ठरत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढले तरीही महायुतीतील या तिन्हीही घटक पक्षात मत भिन्नता व मन भिन्नता होणार नाही. असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ पातळीवर या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वतोपरी चर्चा झाली आहे. समंजसानेच आम्ही निवडणूक लढवीत आहोत. कुठेही कोणीही नाराज होणार नाही असा विश्वास व्यक्त करतेवेळी बावनकुळे यांनी येत्या दोन-तीन दिवसात युती व जागा वाटपाचा निर्णय जाहीर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परभणी जिल्ह्यात पाथरी नगरपालिका निवडणुकीतील नाराजीचा विषय निश्चितच दूर केला जाईल नाराज कार्यकर्ते आमचेच आहेत. माननीय बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले.









