Allegation that police tore down Rama's posters in Malvani?
Allegation that police tore down Rama's posters in Malvani?

मालवणीत भाजपाने लावलेले रामाचे पोस्टर्स पोलीसांनी फाडल्याचा आरोप?

Allegation that police tore down Rama's posters in Malvani?
राकेश जाधव प्रतिनिधी

मुंबई :- भाजपने मालवणी येथे राम मंदिरासंदर्भात लावलेले पोस्टर मालवणी पोलिसांनी फाडल्याच्या आरोप होतोय. या आरोपनंतर आता भाजपने आक्रमक पवित्रा धारण केला असून येथील भाजप नेते आज 23 जानेवारी मालवणी पोलीस ठाण्यावर जाऊन यासंबधी जाब विचारणार आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार अतुल भातखळकर यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा यात सहभाग असेल.

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठीचे सर्व अडथळे दूर झाल्यानंतर अनेक गटांकडून मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाचे काम सुरु आहे. भाजपडून मंदिर उभारणीसंबंधी जनजागरण मोहीम राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मालवण भागात राम मंदिर उभारणीविषयी माहिती देणारं बॅनर लावण्यात आलं होतं. मालवणी पोलिसांनी हे बॅनर 15 जानेवारी रोजी फाडल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच बॅनर फाडल्यामुळे शेकडो हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचंहीभाजपने म्हटलं आहे.

हा प्रकार घडल्यानंतर भाजप नेते गणेश खणकर, माजी नगरेवक आणि मुंबई भाजपचे सचीव विनोद शेलार यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी मालवणी पोलिसांना याबाबत विचारले. मात्र, चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर येथील पोलिसांनी भाजप नेत्यांवरच कारवाई करण्यास सुरुवात केली, असा आरोप भाजपने केला आहे.

पोलिसांना जाब विचारणार

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजप आमदार भाई गिरकर, भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री योगेस सागर, भाजप आमदार सुनील राणे, भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते आज मालवणी पोलीस ठाण्यात जाणार आहेत. यावेळी ते येथील पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या कारवाईबाबत विचारणा करणार आहेत. त्यामुळे राम मंदिरासंबंधिचे बॅनर फाडण्याचं हे प्रकरण आगामी काळात चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here