नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा, शासकीय रुग्णालयाबाहेर मृतदेहाचे डुकरांनी तोडले लचके.

52

नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा, शासकीय रुग्णालयाबाहेर मृतदेहाचे डुकरांनी तोडले लचके.

नांदेड:- माणुसकीला काळिमा फासणारी व प्रंचड चिड आणणारी घटना उघडकीस आली. नांदेड येथील शंकरारव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या बाहेर बुधवारी सकाळी अज्ञात मृतदेहाचे डुकरे लचके ताेडत असताना काही जणांना दिसले. त्यामुळे परिसरात एकच गाेंधळ उडाला. हा मृतदेह साधारणतः दाेन ते तीन दिवसांपुर्वी परिसरात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालय व्यवस्थापनावर नागरिकांचा राेष वाढला आहे.

विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालय परिसरात एका अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे लचके तोडताना डुकर दिसत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या भावना बोथट झाल्या की काय असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी व प्रंचड चिड आणणाऱ्या या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन रुग्ण किंवा मयताबाबत किती गंभीर आहे याबाबत प्रशचिन्ह उपस्थित होत आहेत. हा प्रकार बुधवारी सकाळी काही रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात आला.