बाबुळगाव बोबडे येथे भीम शाखेचे उद्घाटन, अध्यक्ष सागर बगाडे तर उपाध्यक्ष सुरज बगाडे यांची निवड.

✒️प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒️
📱9766445348
वर्धा:- बाबुळगाव बोबडे येथे भीम आर्मी भाई चंद्रशेखर आजाद यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तिथे भीम आर्मी व अन्याय अत्याचार विरुद्ध साठी लढा तसेच विदर्भ मुख्य महासचिव अंकुश भाऊ कोचे यांच्या नेतृत्वामध्ये शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
त्यावेळेस पुलगाव शाखा संघटन शहराध्यक्ष आशिष दवस, तालुका सचिव शाहरुख सय्यद, नाचणगाव शहराध्यक्ष गोलू सुखदेवे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गावकऱ्यांची संलग्न चर्चा करून त्याच्या संमतीने सागर बगाडे यांना बाबुळगाव बोबडे शाखा अध्यक्ष आणि उपशाखा अध्यक्ष सुरज बगाडे असे पदभार देऊन यांना नियुक्त करण्यात आले. स्वागत करून नियुक्ती पत्र समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येऊन यातील सदस्य गण संदीप मांढरे, रोशन हेडवे, यश सोनवणे, गुड्डू खान, सय्यद कादिर, सय्यद अफजल, शाहरुख, भूपेंद्र तायडे, गणेश राऊत, राजेश बगडे, उमेश बागडे, संजय बागडे, प्रफुल बगडे, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे, रणजीत चव्हाण, निलेश चव्हाण, रोहित कांबळे, नितेश चव्हाण, अरविंद वर्घात, अजय बागडे, शंकर चव्हाण, संकेत नाईक उपस्थित होते.
भीम आर्मी जिंदाबाद अशी नारेबाजी करून पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक मंगलमय शुभेच्छा देऊन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.