गोंडपिपरीत बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी,ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे रुग्णांना फळवाटप

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती गोंडपिपरी येथे उत्साहात साजरी करन्यात आली.यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करीत बाळासाहेब अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.
बाळासाहेबांच्या फोटोला अभिवादन करून ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरि येथे रुग्णांना फळवाटप करन्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,रमेश नायडू,बब्बू पठाण,बळवंत भोयर,विवेक राणा,नाना मडावी,बालू झाडे, तुकाराम सातपुते,युवराज बांबोडे,यादव झाडे,शुभम बावणे,अधिरक देवगडे,सुरज भोयर,ईश्वर सोनटक्के,नितीन रामगिरकार या शिवसैनिकांसह व्यसनमुक्ती सामाजिक संघटनेचे गणपती चौधरी यांनी उपस्थिती होती.