दोंडाईचा येथे स्वच्छ दूध निर्मीती विषयक प्रशिक्षण संपन्न.

55

दोंडाईचा येथे स्वच्छ दूध निर्मीती विषयक प्रशिक्षण संपन्न.

दोंडाईचा येथे स्वच्छ दूध निर्मीती विषयक प्रशिक्षण संपन्न.
दोंडाईचा येथे स्वच्छ दूध निर्मीती विषयक प्रशिक्षण संपन्न.

✒नामदेव धनगर✒
धुळे जिल्हा प्रतिनिधी
📱मों.9623754549

शिंदखेडा:- शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा येथे आत्मा योजने अंतर्गत कौशल्य आधारीत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी स्वच्छ दूध निर्मिती काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ धनराज चौधरी, शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, धुळे यांनी केले. आज रोजी तालुक्यातील दोंडाईचा येथे दुध उत्पादक शेतक-यांसाठी आयोजित कार्यक्रमाचे वेळी प्रमूख मार्गदर्शक श्री चोधरी यांनी भारतीय वंशाचे जनावरे, त्यांची निगा राखणे, जोपासना करणे यावर माहिती देतांना दूध काढणारी व्यक्ती, दुधाळ जनावरे व सभोवतालचे वातावरण विषयक त्रिसुत्री सांगतांना स्वच्छ दूध निर्मिती हे कौशल्य असून त्याची प्रभावी अमंलबजावणी आपल्या दैनंदिन व्यवहारात करणे विषयी सविस्तर सोप्या भाषेत चर्चा केली.

शेतकरी प्रशिक्षण प्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना आत्माचे प्रकल्प उपसंचालक सुनिलकुमार राठी यांनी शेतकरी गट,  शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व शेतमालाचे विक्री व्यवस्थापन विषयक माहिती दिली. तसेच कृषि पुरक दुग्ध व्यवसाय बाबत मार्गदर्शन केले. अघ्यक्ष स्थानावरुन मार्गदर्शन करतांना जिल्हा परीषद सदस्य श्री महाविरसिंग रावल यांनी शेतक-यांना दूध संकलन व मुल्यवृध्दी बाबत चे महत्व विषद केले. कार्यक्रम प्रसंगी दोंडाईचा दूध उत्पादक संघाचे व्हाईस चेअरमन व आत्मा चे तालुका अघ्यक्ष श्री रघुविरजी बागल यांनी परीसरातील दूध उत्पादक यांना पांरपारीक माहितीतंत्र व विज्ञान यांची सांगड घालुन दुध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे बाबत प्रतिपादन केले. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त श्री विसावे यांनी शेतक-यांना पशुसंवर्धन विषयक योजनांची माहिती दिली. शेतकरी प्रशिक्षण प्रसंगी झिरवे, धावडे, मालपूर, निमगुळ, तावखेडा प्र न दोंडाईचा, वणी, परीसरीतील बहूसंख्य दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

दोंडाईचा येथील स्वच्छ दुध निर्मिती प्रशिक्षणासाठी दुध उत्पादक संघाचे मॅनेजर श्री गोरखसिंग गिरासे, सर्व कर्मचारी वृंद तसेच परीसरातील दुध उत्पादक ,हितेंद्र  गिरासे, तावखेडा प्र न, राजेंद्र पाटील, चिमठाणे, शानभाऊ पाटील, निमगुळ तसेच कृषि अधिकारी नवनाथ साबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वच्छ दुध निर्मिती प्रशिक्षण वर्गाचे प्रास्ताविक विनय बोरसे तालुका कृषि अधिकारी, शिंदखेडा यांनी केले. सुत्र संचलन दिलीप भोई कृषि सहाय्यक, दाऊळ ता. शिंदखेडा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि पर्यवेक्षक, बी जी वाघ, श्री आर एच बाविस्कर तसेच स्वप्नील अहिरे ए टी एम, धुळे व संदिप पवार आत्मा बी टी एम, शिंदखेडा यांनी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रम आयोजनासाठी विठ्ठल जोशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ,धुळे तसेच श्री एस डी मालपुरे, उपविभागीय कृषि अधिकारी, धुळे यांचे मार्गदर्शन लाभले.