पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, वाढोणा येथील घटना, नुकसानभरपाईची मागणी.

53

✒अरुण रामुजी भोले✒
नागभिड तालुका प्रतिनिधि
📱9403321731

नागभिड:- नागभिड तालुक्यातील वाढोणा येथील उष्टू दामोदर येसनसुरे या शेतकऱ्याच्या तरुण बैलाला पट्टेदार वाघाने येथील देवार बोळीत ठार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.यामुळे या गरीब शेतकऱ्याची आर्थिक नुकसान झाली आहे.

तळोधी वनपरिक्षेत्रअंतर्गत येत असलेल्या आलेवाही बीटातील वाढोणा येथील शेत शिवार व स्मशान भूमिला लागून असलेल्या देवार बोळीत पट्टेदार वाघाने येथील शेतकरी उष्टू दामोधर येसनसुरे यांच्या 6 वर्षाच्या तरुण बैलाला ठार केले. ही घटना सायंकाळी घडली असावी. असा नागरिकांचा कयास आहे. सायंकाळी बैल घरी चराई वरुन घरी न आल्याने बैल मालकाने इतरत्र शोधाशोध सुरु केली. दरम्यान शनिवारी देवार बोळी जवळील शेत शिवारात गट नं.1272 मध्ये बैल खाललेल्या अवस्थेत आढळून आला यामुळे गरीब शेतकऱ्याची आर्थिक नुकसान झाली आहे. त्यामुळे सदर बैलमालकास नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास धोंडने यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस. बी.पेंदाम, वनमजूर सोमेश्वर निकुरे यांनी पंचनामा केला. यावेळी वाहन चालक दीपक बारसागडे, रोहित पेंदुलकर, स्वाब नेचर केअर चे सदस्यांची उपस्थिती होती.

पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, वाढोणा येथील घटना, नुकसानभरपाईची मागणी.
पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला बैल.

काही अंतरावर बघितला वाघ,

सकाळी नेहमीप्रमाणे वाढोणा येथील गुरूदास गुरनुले हे देवार बोळी शेजारी सरपण गोळा करीत असताना त्यांनी वाघ बैलावर ताव मारताना अगदी जवळून बघितला.आणि बोंबाबोन्ब केल्याने वाघाने पळ काढला असल्याचे उपस्थितांनी सांगितले.