कामगार नेते वैज्ञानिक डॉ. उमेश वावरे यांनी केली नवीन पक्षाची स्थापना.
वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर कामगार नेते वैज्ञानिक डॉ. उमेश वावरे यांनी रविवारी हिंगणघाट येथे नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. ‘वर्धा जिल्हा विकास आघाडी’ असे या पक्षाचे नाव आहे. स्थनिक वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याबरोबर झालेल्या वादा नंतर डॉ. वावरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिली होती.
✒प्रशांत जगताप/मुकेश चौधरी✒
📲75071 30263
वर्धा/हिंगणघाट:- वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर कामगार नेते डॉ. उमेश वावरे यांनी रविवारी वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहरातील रेस्ट हाऊस मध्ये नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. ‘वर्धा जिल्हा विकास आघाडी’ असे या पक्षाचे नाव आहे. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी दिलेल्या वागणुकीतुन डॉ. उमेश वावरे हे माघील अनेक दिवसापासुन नाराज होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यां बरोबर पत्रकार परिषद घेउन यांच्या मदतीने राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे या नवा राजकीय पक्षाची धुरा वैज्ञानिक असलेले डॉ. उमेश वावरे यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
वर्धा जिल्हा विकास आघाडी हा पक्ष वर्धा जिल्हातील स्थानिक नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायतच्या सर्व निवडणुका लढवेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे वर्धा जिल्हातील शेकडो नाराज कार्यकर्ते डॉ. उमेश वावरे यांच्या ‘वर्धा जिल्हा विकास आघाडीला’ पाठिंबा देणार आहे.
पक्ष स्थापनेच्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. उमेश वावरे यांनी दिलेल्या माहिती मध्ये. आम्ही हिंगणघाट तालुक्या बरोबर वर्धा जिल्हातील प्रत्येक गावाचा विकास कशा करता येइल याची ब्लू प्रिंट तयार करत आहोत. आम्ही विकासाचा नवा संकल्प करुन सर्व जनते पर्यंत जात आहोत. आम्हाला तुम्हचा पाठींबा द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी मनिष कांबळे, जिवन उरकुडे, दिलीप कहुरके कमलाकर मांडवकर, देवेंद्र तिपल्लीवार, अरुण काळे, महेंद्र हांडे, चारु आटे, अंकुश राखूडे, रमेश कळमकर, प्रदिप माणिकपुरे, कैलाश मुन, दिपक गोरघाटे यांच्या सह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.