नागभिड तालुका मधील मोहाळी येथील डांबर प्लांट बंद करा, प्रहार संघटना व गावकऱ्यांची मागणी

नागभिड तालुका मधील मोहाळी येथील डांबर प्लांट बंद करा— प्रहार संघटना व गावकऱ्यांची मागणी

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधि
9403321731

गुरुबकसानी डांबर प्लांट कुनघाडा (चक) मोहाडी (मोकासा) इथे बरेचं वर्षापासुन सुरु असलेल्या डांबर प्लांट वर आक्रमंक भुमीका घेवून प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड /प्रहार जनशक्ती पक्ष मांगली आणि कुनघाडा चक येथील सरपंच डांबर प्लांट मध्ये जाऊन डांबर प्लांट बंद करण्यात आला. पण दोन दिवसाच्या मुदती वाढ मागल्या ने 100 कामगारांच्या विचार करून दोन दिवसांची मुदत देण्यात आली.

जर दोन दिवसांमध्ये निर्णय नाही घेतला. पूर्ण पणे कंपनी बंद करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड कुनघाडा चक आणि मांगली. हे घेणार या डांबर प्लांट मुळे कुनघाडा चक आणि मोहाडी या गावकर्‍यांना त्रास सहन करावा लागतो. कंपनीमुळे गावकऱ्यांच्या कुटुंबाच्या त्रास वाढत असून सुद्धा सकाळी गाव धुरामुळे दिसत नाही. धुरामुळे श्वासाचा त्रास व इतर आजारांचा त्रास होऊनसुद्धा डांबर प्लांट चे मालक आणि मॅनेजर लक्ष देत नाही. व ग्रामपंचायत बिकली येथील सरपंच व सचिव यांनी नोटीस द्वारे सुद्धा कळवले होते.

मॅनेजरशी चार दिवसा आधी संवाद साधला परंतु संवाद साधताना दिलीप सहारे दोन दिवसांनी मालकाला बोलून आणि इंजिनिअर , बोलून या कंपनीची दखल घेतील.जाईल अशी माहिती दिलीप सहारे यांनी प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड यांना दिली होती. सरपंच साहेबांनी कंपनीला नोटीस पाठवून डी ,सी, गुरुबकसाणी टाळाटाळ करत होते.
जोपर्यंत डी ,सी, गुरुबकसाणी कंपनीमध्ये जे पर्यंत प्रस्तेस येऊन बोलणार नाही तेव्हापर्यंत कंपनी बंद ठेवू म्हणून समस्त गावकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन कंपनीमध्ये धाव घेतली व कंपनी तातडीने बंद केली.

परंतु 100 मजुराचा विचार करून आजपासून दिनांक 23/01/2022 ते 27/01/2022 पर्यंत कंपनी चालू ठेवणार अशी ग्वाही पत्राद्वारे देण्यात आली आहे,यावेळी गावकरी वह प्रहार संघटने चे पदाधिकारी बहुसंख्येनी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here