१० दिवसाच्या बाळाच्या विक्रीची धक्कादायक घटना, ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

१० दिवसाच्या बाळाच्या विक्रीची धक्कादायक घटना, ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

१० दिवसाच्या बाळाच्या विक्रीची धक्कादायक घटना, ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob: 9834024045

तुला HIV आहे लहान बाळाचा सांभाळ तू कशी करणार? नागपूर येथे माझ्या ओळखीचा NGO आहे ते लहान बाळाचा सांभाळ करतात, जर तू बाळाला जवळ ठेवशील तर त्यालाही HIV होऊन जाणार, असे सांगत पीडित महिलेकडून अवघ्या 10 दिवसाचे बाळ मीना राजू चौधरी नामक महिलेने घेत 23 महिलांच्या ताब्यात दिले. काही दिवसांनी त्या पीडित महिलेला 49 हजार रुपये मीना चौधरी यांनी दिले असता, त्या महिलेने पैशे कशासाठी अशी विचारणा केली तर त्यावर चौधरी यांनी तुझ्या बाळाला सांभाळणाऱ्या NGO ने पैसे दिले असे सांगितले. 

मात्र पीडित महिलेला याबाबत संशय आला तिने त्या महिलेला मला बाळाला भेटायचे असा हट्ट धरला मात्र चौधरी टाळाटाळ करायला लागली, पीडितेला बाळाला दुसरीकडे विकले असावे असा संशय आला तिने याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

पीडित महिलेने 13 जानेवारीला एका गोड्स बाळाला जन्म दिला, तिच्या घराशेजारी राहणारी मीना चौधरी ही तिला नेहमी भेटायला यायची, पीडित महिलेला 15 जानेवारीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती मात्र मीना ने त्या महिलेला घरी न नेता लोहारा येथील लोटस हॉटेल मध्ये नेले. तिथे पीडितेला HIV आहे तर तुझ्या बाळाला हा आजार होऊ शकतो यासाठी तू आपल्या बाळाला नागपूर येथील NGO च्या स्वाधीन कर तिथे तुझे बाळ सुखरूप राहणार अशी बतावणी करीत तिचे बाळ मीना ने ताब्यात घेत नागपूर येथून आलेल्या तीन महिलांच्या ताब्यात दिले.

पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध कमाक 53 / 2022 कलम 370 , 417 , 420 , 34 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. व सदर घटनेचे गार्भिय खुप जास्त असल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे शांखा प्रमुख पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना याबाबत सांगण्यात आले.  त्यांच्या आदेशाने पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे यांना त्याचे पथकासह पुठिल कार्यवाही करण्याकामी रवाना करण्यात आले.

घटनेची माहीती घेतली असता यातील प्रमुख आरोपी नामे मिना राजु चौधरी हिला ताब्यात घेण्यात आले व तिला विचारपुस केली असता तिने तिचा प्रियकर नामे जाबिर रफिक शेख वय 32 रा . बल्हारशा व अजुंग सलीम सय्यद वय 43 रा . भिवापुर वार्ड चंद्रपुर यांचे मदतिने नागपुर येथिल वनिता कावडे पुजा शाहु शालीनी गोपाल मोडक सर्व रा . नागपुर यांना सदर नवजात बाळ 275,000 / -रू किमतीला विकल्याचे कबुल केले. त्यावरूण तात्काळ कोणताही विलंब न करता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे यांचे सह एक पथक नागपुर करीता रवाना करण्यात आले. त्यांनी आपले गोपनिय माहीती व तपास कौशल्य वापरूण वरील नमुद तिन्ही महीलांना बददल माहीती घेतली असता दोन महीला रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणुन काम करीत असल्याची माहीती प्राप्त झाली त्यावरूण त्यांना नागपुर येथुन ताब्यात घेतले व 10 दिवसाचे बाळा बाबत विचारणा केली असता त्यांनी सदर बाळ हे चंद्रपुर येथे दिल्याचे धक्कादायक माहीती प्राप्त झाली. त्यावरूण नागपुर येथिल महीला नामे वनिता मुलचंद कावडे, पुजा सुरेद्र शाहु, शालीनी गोपाल मोडक यांना ताब्यात घेतले व तात्काळ चंद्रपुर येथे घेवुन आलो. नमुद महीला यांनी बाळाला कोणाला विकले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर बाळ हे स्मीता मानकर नावाच्या महीलेला दिल्याची माहीती समोर आली त्यावरूण तात्काळ महीलेचा पत्ता प्राप्त करूण तिच्या घरी गेले असता नवजात बाळ सुखरूप असल्याचे दिसुन आले.

नवजात बालकास ताब्यात घेवुन त्याची वैधकिय तपासणी करीता त्यास जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले असुंन सदर प्रकणात एकुण 6 आरोपी नामे 1 ) मिना राजु चौधरी वय 34 रा.शाम नगर चंद्रपुर 2 ) जाबिर रफिक शेख वय 32 रा . बल्हारशा 3 ) अजुंम सलीम सय्यद वय 43 रा . भिवापुर वार्ड चंद्रपुर 4 ) वनिता मुलचंद कावडे वय 39 5 ) पुजा सुरेद्र शाहु वय 29 धंदा स्टॉफ नर्स 6 ) शालीनी गोपाल मोडक वय 48 धंदा स्टॉफ नर्स तिन्ही रा . नागपुर यांना अटक करण्यात आली असुन पुठिल तपास रामनगर पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सपोनि जितेद्र बोबडे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, संजय आतकुलवार, अमोल धंदरे संतोष येलपुरवार कुंदनसिंग बावरी रविंद्र पंधरे , गोपाल आतकुलवार नितीन रायपुरे प्राजल झिलपे महीला पोलीस अपर्णा मानकर निराशा तितरे यांचे पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here