ट्रकच्या धडकेत मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
•लोनगाडगा येथील घटना
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351
वरोडा : 22 जानेवारी
माढेळी मार्गावर मॉर्निंग वॉक ला जात असताना कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने एका व्यक्तीस चिरडल्याची घटना 22 जानेवारी रोजी घडली. या घटनेत राजू बाबाराव दारुंडे (45 रा. लोनगाडगा ) यांचा जागीच मृत्यू झाला. राजू दारुंडे हे सकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नी समवेत फिरायला गेले होते. मॉर्निंग वॉकला जात असताना माढेळी कडून एकोणा माईंस कडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाला त्याच दरम्यान एका मोटरसायकलस्वाराचे त्याच ट्रक च्या प्रकाशाने डोळे दिपल्याने त्याचा सुद्धा अपघात होऊन तोही मृतकाच्या बाजूला पडला असल्याचे समजते.
लोनगाडगा वंधली, पांझुर्णी या गावातील लोकांनी ट्रक वाहतूक बंद करण्यात यावी. ही मागणी केली असून मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
अपघातानंतर मृतकाला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले व विच्छेदन करण्यात आले.
मृतक दारुंडे यांना दोन लहान मुले असून ट्रक वाहतूकदाराने व वेकोलीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.