रामनामाच्या जयघोषाने दुमदुमली राजुरा नगरी : आ. सुभाष धोटेंच्या नेतृत्वात भव्य रॅलीचे आयोजन.
✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230
राजुरा (ता. प्र) :- अयोध्या नगरीत जगाचे पालनहार भगवान श्री. राम मंदिर येथे प्रभू श्री. रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून गांधी चौक राजुरा येथील श्री. राम मंदिर ते जुना बसस्टाप पर्यंत लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी भजन किर्तन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभू श्री. राम यांच्या जयघोषात संपूर्ण राजुरा नगरी दुमदुमली. लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांनी गांधी चौक राजुरा येथील श्री. राम मंदिर, श्री. व्यंकटेश मंदिर, श्री. हनुमान मंदिर, श्री. संकट मोचन हनुमान मंदिर, श्री. राम मंदिर येथे उपस्थित राहून आरती केली, दर्शन घेतले. क्षेत्रातील जनतेला सुख, शांती, समृद्धी, सुदृढ आरोग्यासाठी कामना केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अॅड. सदानंद लांडे, अशोकराव देशपांडे, अॅड. अरूण धोटे, राजेंद्र चांडक, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, माजी जि. प. सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, साईनाथ बत्कमवार, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, गजानन भटारकर, सय्यद सखावत अली, शब्बीर पठाण, शंकर गोनेलवार, अभिजीत धोटे, शंतनु धोटे, एजाज अहमद, संतोष गटलेवार, उमेश गोरे, कोमल फुसाटे, धनराज चिंचोलकर, सय्यद साबीर, शहनवाज कुरेशी, कविता उपरे, इंदूताई निकोडे, निता बानकर यासह राजुरा शहरातील व्यापारी, उद्योजक, महिला, पुरुष, युवा, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.