बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी..! – उद्धव ठाकरेंची टीका। नाशिकच्या सभेत भाजपवर सडकून टीका।

54
बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी..! - उद्धव ठाकरेंची टीका। नाशिकच्या सभेत भाजपवर सडकून टीका।

बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी..! – उद्धव ठाकरेंची टीका।

नाशिकच्या सभेत भाजपवर सडकून टीका।

बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी..! - उद्धव ठाकरेंची टीका। नाशिकच्या सभेत भाजपवर सडकून टीका।

ज्ञानेश्वर तूपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी

नाशिक दि: २३ बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी आहे, अशी टीका आज उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नाशिकमध्ये आज शिवसेना (उबाठा गटा)ची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी ते बोलते, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर कडाडून टीका केली आहे. मंदिराच्या उद्घाटनासाठी रामनवमी पर्यंत थांबला असतात तर काही बिघडलं नसतं असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच राम मंदिरासाठी आणि कलम ३७० हटवण्यासाठी आम्ही भाजपाला पाठिंबा दिलाच होता हे मी जाहीरपणे सांगतो आहे. असंही आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझं वैयक्तीक वैर नाही. पण, हे लोक मित्रपक्षालाच संपवायला निघाले आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. ते नाशिकमधील जाहीर सभेत बोलत होते.

हिंदूंवरचे अत्याचार कमी होण्यासाठीही आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. पण जेव्हा कठीण काळ होता तेव्हा शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली. अटलबिहारी वाजपेयी यांना जेव्हा केराच्या टोपलीत टाकायला निघाले तेव्हा शिवसेनाप्रमुख तुमच्या मदतीला धावले. ती शिवसेना आज तुम्ही संपवायला निघाला आहात? हे तुमचं हिंदुत्व आहे? संपवायचं असेल तर मैदानात या. आम्ही मैदानात आहोत. मात्र स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहणार. आमचं कवच काढून घेणार पण मी त्यांना सांगतो आज माझ्यासमोर आहे ते आमचं कवच आहे काढून घ्या. पोलीस, निमलष्करी दल, बॉम्ब जॅमर इतकं सगळं करुन तुम्ही ५६ इंची छाती दाखवणार का? माझ्या शेतकऱ्याची हडकुळी छाती तुम्हाला भारी पडणार आहे.”

शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे कारण मी वारसा घेऊन पुढे चाललो आहे. मात्र भाजपाचे लोक म्हणजे दंगल झाली की पळणारी अवलाद. आमच्या नेत्यांवर, शिवसैनिकांच्या घरी ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांच्या धाडी पडतात. घर आमच्या कार्यकर्त्याचं तिथे हे लोक पाय पसरुन बसतात. येऊ दे आमची सत्ता तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी इशाराही दिला आहे.

*मोदी सारखे ढोंगी नेते देशात कोणी झाले नाही : संजय राऊत*

संजय राऊत यांनी जाहीर सभेत मोदींचा चांगला समाचार घेतला ते म्हणाले की मोदी सारखा ढोंगी नेता कोणी झाला नाही. 2014 व 2019 ला दोन्ही वेळी मोदी नाशिक मध्ये आले होते. नाशिक मध्ये येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देणार हे वचन दिले होते त्या वचनाचं काय झालं. अयोध्यात मोदी हे अकरा दिवस मंदिरात ब्लॅंकेटवर झोपले पण देशातील 40 कोटी जनता रस्त्यावर झोपते याकडे लक्ष द्या ढोंग कशाला करता.
तुम्ही अकरा दिवस उपवास केला पण देशातील 80 कोटी जनता अर्धपोटी आहे.
अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा च्या आनंदी सोहळ्यात तुम्ही रडताय, पुलवामा मध्ये 40 जवान मारले गेले यांच्या डोळ्यात एक अश्रू नाही, महाराष्ट्रात दीड वर्षात दोन हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, देशात व राज्यात महिलांवर अत्याचार व बलात्कार होतात मात्र मोदी यांच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत. पण निवडणूक आली की असे प्रसंगा वेळी हे महाशय डोळ्यातून अश्रू काढून ढसाढसा रडतात. हे मगरीचे अश्रू आहे, खोटे अश्रू आहेत.
तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन अक्षदा वाटल्या, अक्षदा काय वाटतय पंधरा पंधरा लाख रुपये द्या जे तुम्ही वचन दिलं होतं.