कांदळवनाची कत्तल व भराव करणाऱ्यांवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ बोर्ली सरपंच प्रजासत्ताक दिनी धरणे आंदोलनाच्या पावित्र्यात.

97

कांदळवनाची कत्तल व भराव करणाऱ्यांवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ बोर्ली सरपंच प्रजासत्ताक दिनी धरणे आंदोलनाच्या पावित्र्यात.

कांदळवनाची कत्तल व भराव करणाऱ्यांवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ बोर्ली सरपंच प्रजासत्ताक दिनी धरणे आंदोलनाच्या पावित्र्यात.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-मौजे कोलमांडला – बोर्ली येथील कांदळवनांची मोठया प्रमाणावर कत्तल करून बेकायदेशीर भराव करून नदी व खाडीचे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बदलणाऱ्यां गौरव सत्यपाल जैन यांचेवर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे कांदळवनांच्या संरक्षणासाठी व बोर्ली गाव पावसाच्या पुरामध्ये बुडू नये यासाठी चालू असलेला बेकायदेषीर भरावाच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी तहसिलदार कार्यालय मुरूड येथे धरणे आंदोलन धरणे बाबतचे पत्र मुरुडचे तहसीलदार,जिल्हा पोलीस अधीक्षक,पोलीस ठाणे मुरुड यांना दिले आहे,
सदरील पत्रा मध्ये सरपंच यांनी बोर्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मौजे कोलमांडला येथे गौरव सत्यपाल जैन यांनी मौजे कोलमांडला – बोर्ली येथील कांदळवनांची मोठया प्रमाणावर कत्तल करून बेकायदेशीर भराव करून नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बदलले आहे. जैन यांचेवर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे कांदळवनांच्या संरक्षणासाठी व बोर्ली गाव पावसाच्या पुरामध्ये बुडू नये यासाठी चालू असलेला बेकायदेशीर भरावाच्या निशेधार्थ तहसिलदार कार्यालय मुरूड येथे धरणे आंदोलन धरणार आहेत.
सदरच्या कांदळवानांवरच्या भरावाच्या विरूध्द् त्यांनी 14/01/2025 रोजी लेखी तक्रार जिल्हाधिकारी रायगड , उपविभागीय अधिकारी अलिबाग, विभागीय वन अधिकारी दक्षिण – कोकण, अलिबाग , तहसिलदार मुरूड , अपर आयुक्त कोकण विभाग मुंबई यांचे कार्यालयात प्रत्यक्ष भेटून तक्रार अर्ज दिलेला असतानाही गौरव सत्यपाल जैन यांच्या दबावाखाली कोणताही अधिकारी कारवाई करण्यास पुढे येत नाही ही मोठी शोकांतीका आहे.
त्यामुळे बोर्ली कोलमांडला गावालगत असणारी नैसर्गिक कांदळवने व बोर्ली गावालगत असणाऱ्यां खाडी व नदीचे नैसर्गिक प्रवाह बदलु नये व पावसाळयात बोर्ली गाव पुराच्या पाण्यात डुबु नये यासाठी दिनांक 26/01/2025 रोजी तहसिलदार कार्यालयासमोर गौरव सत्यपाल जैन याच्या विरोधात सरकार गुन्हा दाखल करत नाही त्याचे निशेधार्थ धरणे आंदोलन धरणार आहेत. सदरच्या धरणे आंदोलनात 25 ते 30 महिला व परिसरातील नागरीक धरणे आंदोलनात सामिल होणार आहेत.
——
कांदळवनांची बेकायदेशीर कत्तल करून त्यावर भराव टाकणाऱ्याला महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे,ही लोकशाहीची हत्या म्हणावी लागेल,प्रजासत्ताक दिनी धरणे धरून शासनाचे डोळे उघडून न्याय मिळेल यासाठी धरणे धरणार आहोत,
—-सपना संजय जायपाटील
सरपंच बोर्ली ग्रामपंचायत,