“रा. जि. प. शाळा खारगांव मध्ये उपतालुका प्रमुख श्री. हेमंत नाक्ती यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप”

40

“रा. जि. प. शाळा खारगांव मध्ये उपतालुका प्रमुख श्री. हेमंत नाक्ती यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप”

✍️निखिल सुतार ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133📞

म्हसळा:-, 23 जानेवारी 2025:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तर्फे रा. जि. प. शाळा खारगांव मध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन उपतालुका प्रमुख श्री. हेमंत नाक्ती यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वितरीत करण्यात आले. युवासेना तालुका अधिकारी मा. कौस्तुभ करडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले आणि समाजाला योगदान देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात अन्य मान्यवरांमध्ये मा. सभापती लाड साहेब , मा. दिघीकर साहेब, म्हसळा शहर प्रमुख मा. विशालजी सायकर, तालुका संघटक बाळा म्हात्रे, शिवसैनिक श्री. नरेशजी विचारे, शहर अधिकारी अंकुश नटे, उपशहर अधिकारी स्वानंद बोरकर आणि शाखाप्रमुख नरेश मेंदाडकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समाप्तीला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वितरीत करण्यात आले, आणि यावेळी उपस्थित मान्यवरांनी शालेय शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांना उत्तम भविष्यासाठी प्रेरणा दिली.