म्हसळा, 23 जानेवारी 2025:

44

म्हसळा, 23 जानेवारी 2025:

म्हसळा, 23 जानेवारी 2025:

“युवासेना म्हसळा तालुका तर्फे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा भेट”

✍️निखिल सुतार ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133📞

म्हसळा :-युवासेना म्हसळा तालुका तर्फे शासकीय पंचायत समिती कार्यालयात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी युवासेना तालुका अधिकारी श्री.कौस्तुभ विलास करडे यांनी प्रामुख्यानं मनोगत व्यक्त करताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी संपुर्ण हिंदुस्थानाला गर्व से कहो हम हिंदू है हा नारा दिला व ठाकरे यांनी मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना संघटनेची स्थापना १९६६ साली केली. ही संघटनेची शिकवण ८०%समाजकारण २०% राजकरण ह्या मुळमंत्रांवर लोकांची सेवा आजही करत आहे हे करडे यांनी परखडपणे मांडले.
त्यानंतर वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास ज्यात मा. सभापती लाड, मा. दिघीकर साहेब, युवासेना तालुका अधिकारी मा. कौस्तुभ करडे, म्हसळा शहर प्रमुख मा. विशालजी सायकर, तालुका संघटक बाळा म्हात्रे, उपतालुका प्रमुख हेमंत नाक्ती,उपतालुका प्रमुख श्री.राजाराम तीलटकर,शिवसैनिक श्री. नरेशजी विचारे, शहर अधिकारी अंकुश नटे, उपशहर अधिकारी स्वानंद बोरकर व शाखाप्रमुख नरेश मेंदाडकर हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची आणि विचारधारेची महत्त्वपूर्ण चर्चा केली.