नंदगावात शासकीय मालमत्तेची इलेक्ट्रिक पोल व विद्युत वाहक तारेची जबरी चोरी

38

नंदगावात शासकीय मालमत्तेची इलेक्ट्रिक पोल व विद्युत वाहक तारेची जबरी चोरी

नंदगावात शासकीय मालमत्तेची इलेक्ट्रिक पोल व विद्युत वाहक तारेची जबरी चोरी

✍️ निलेश सोनवणे ✍️
जळगाव तालुका प्रतिनिधी
मो 9922783478

जळगाव :- जळगांव तालुक्यातील घटना याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदगाव ता.जळगांव येथील प्रगतिशील शेतकरी श्री.साहेबराव सुका चांभार याच्या मालकीची गट नंबर 135/2 व गट नंबर 140 असे दोन नंदगावातील शिवारात शेती क्षेत्र आहे.त्याच्या शेतामध्ये गट नंबर 156/1 त्र्यंबक भावजी सोनवणे यांच्या शेताच्या डीपी वरून गट नंबर 156/2/अ , गट नंबर 135/2 , गट नंबर 140 , व श्री.धिरेंद्र एकनाथ जाधव गट नंबर 141 यांच्या शेता पर्यंत इलेक्ट्रिक पोल जोडलेले होते.मागील 2 ते 3 वर्षांत अशीच चोरी झाली होती, ही शासकीय मालमत्ता असल्याने याची तक्रार सदरील शेतकऱ्याने म.रा.वि.मंडळ च्या कर्मचाऱ्यांना कळविले होते.परंतु त्यांनी या कडे दुर्लक्ष करत कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिस प्रशासनास दिली नव्हती .परत तशीच चोरीची पुनरावृत्ती होऊन दिनांक 11/01/2025 रोजी रात्री सदरील शेतकऱ्याच्या शेतातूनच शासकीय मालमत्तेची 2 इलेक्ट्रिक पोल व ॲल्युमिनियम विद्युत वाहक 360 मिटर तारेची जबरी चोरी झाली आहे.सदरील चोरी ही शेतकऱ्याच्या मुलाला लक्षात आल्याने संबधित गावातील वीज कर्मचारी श्री चंद्रकिरण सोनवणे यास फोन वरून कळविले असता त्याने कनिष्ठ अभियंता श्री. ललित नारखेडे यांना सांगितले.संबधित अधिकाऱ्यांने चोरी झालेल्या ठिकाणी पडताळणी केल्यानंतर जळगांव तालुका पोलीस स्टेशन ला अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील या जबरी चोरीचा तपास हे.काँ.श्री. डी. डी.चौधरी हे करीत आहे.