अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती, जनतेला आठवला चंद्रपूरचा रामोत्सव

34

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती, जनतेला आठवला चंद्रपूरचा रामोत्सव

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती, जनतेला आठवला चंद्रपूरचा रामोत्सव

राम मंदिरात चंद्रपूरचे काष्ठ

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 23 जानेवारी
22 जानेवारी 2024 हा दिवस ऐतिहासिक ठरला. सुमारे 500 वर्षांचा प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास संपला आणि रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त चंद्रपूरकरांचा उर भरून आला आहे. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या नेत्रदीपक सोहळ्यात चंद्रपूरच्या ऐतिहासिक योगदानाचीदेखील वर्षपूर्ती होत आहे.
कारसेवक म्हणून श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सहभाग नोंदविणारे सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे वनमंत्री म्हणून श्रीराम जन्मभूमीत साकारलेल्या भव्य मंदिरात चंद्रपूरच्या काष्ठाचे योगदान दिले. चंद्रपूर, गडचिरोलीतील सर्वोत्तम सागवान काष्ठ रवाना करण्याचा सोहळा मुनगंटीवार यांनी प्रत्येक चंद्रपूरकरांसाठी अविष्मरणीय ठरेल असाच साकारला. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोष्याध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज या सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी अनेक ख्यातनाम कलाकारांनी आपली कला सादर केली. संपूर्ण चंद्रपूर शहरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अनेक कलापथकांनी आपली कला सादर केली. 1800 क्यूबिक मीटर सागवान काष्ठ अयोध्येला रवाना करण्यात आले.
मुनगंटीवार यांची संकल्पना आणि पुढाकारामुळे 33 हजार 258 पणत्या एकाचवेळी प्रज्वलित करुन ‘सियावर रामचंद्र की जय’ या दीप अक्षरांनी अवघे चांदा क्लबचे मैदान प्रकाशमान झाले होते. या अनोख्या सोहळ्याने विश्व विक्रम तयार केला. त्याची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये घेतली गेली. मुनगंटीवार यांच्यामुळेच या ऐतिहासिक सोहळ्यात आपले योगदान देता आले, अशी भावना चंद्रपूर जिल्ह्यातील रामभक्तंनी आवर्जून व्यक्त केली.