धोकादायक अनधिकृत होर्डींग अखेर अलिबाग नगरपरिषदेने हटविली.
दैनिक मिडिया वार्ता वृत्तपत्रातील बातमीची दखल
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग जिल्हा रूग्णालयासमोरील गेले चार महिने अनधिकृतपणे उभी केलेली अवाढव्य लोखंडी
धोकादायक अनधिकृत होर्डींग अखेर अलिबाग नगरपरिषदेने हटविली आहे.
अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडील जनहित याचिका क्रमांक 155/2011 दिनांक. 19/12/2024 अन्वये सार्वजनिक रस्ते पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डिंग बॅनर पोस्टर विशेष मोहीम घेऊन हटविण्याचे आदेश असल्याचे लेखी निवेदन अलिबाग नगरपरिशदेचे मुख्याधिकारी व संबधीत अधिकारी यांना दिली होती या बाबत चे आपल्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेऊन
ही कारवाई करण्यात आली आहे.
अलिबाग जिल्हा रूग्णालयासमोरील गेले चार महिने अनधिकृतपणे उभी केलेली अवाढव्य लोखंडी धोकादायक अनधिकृत होर्डींग
काढून टाकण्याबाबत अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबधीत अधिकारी यांना वारंवार दुरध्वनी करूनही हे धोकादायक लोखंडी होर्डींग हटविले जात नसल्याची बाब उघड झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाकडील जनहित याचिका क्रमांक 155/2011 दिनांक. 19/12/2024 अन्वये सार्वजनिक रस्ते पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डिंग बॅनर पोस्टर विशेष मोहीम घेऊन हटविण्याचे आदेशित केले होते. नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आणि विना परवानगी जाहिराती होर्डिंग बॅनर पोस्टर आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी देण्याचे आवाहन अलिबाग नगरपरिषदेने वर्तमानपत्रात जाहिर नोटीस देवून प्रसिध्द केले होते. प्रत्यक्षात मात्र जिल्हा रूग्णालयासमोर असेलेली बेकायदा होर्डींग नगरपरिशदेला दिसत नाही अशी टिका होत होती.
या बाबत मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देवून अनधिकृत होर्डिंग बॅनर व पोस्टर्स बाबत जनहित याचिका 155/2011 अन्वये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेशा प्रमाणे अलिबाग जिल्हा रूग्णालयासमोरील गेले चार महिने अनधिकृतपणे उभी केलेली अवाढव्य लोखंडी होर्डींग काढून टाकून संबधीतांविरूध्द महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता वीरूपण अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून संबधीत साहित्य जप्त करण्यात यावी अशी मागणी केली होती.
चार महिने झाले तरी ही होर्डींग तशीच उभी आहे. अलिबागमधील अनेक नागरिकांनी समाजमाघ्यमांवर याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अशास प्रकारच्या अवाढव्य होर्डींग कोसळल्यामुळे गेल्या मे महि-यात घाटकोपर येथे 16 नागरिकांचा हकनाक बळी गेला असल्याची बाब सावंत यांनी मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणून दिली होती.