मुबंई गोवा महामार्गवर एसटी व टेम्पो ट्रॅव्हल्स यांच्यामध्ये भीषण अपघात

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

 

रायगड :-माणगांव तालुक्यातील मुगवली गावच्या हद्दीत दि.२२ फेब्रुवारी रोजी रात्री १.१५ वाजण्याच्या सुमारास एस. टी. व टेम्पो ट्रॅव्हल्स यांच्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतेही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरवृत्त असे की मुबंई गोवा महामार्गावरून पुणेबाजूकडून महाड बाजूकडे चाललेली टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच १४ सी डब्लू ५५०८ व महाड बाजूकडून मुंबई नालासोपाराकडे जाणारी एस. टी. बस क्रमांक २० बी एल १८३४ यामध्ये अपघात झाला यामध्ये टेम्पो ट्रॅव्हल्स बस मधील एकटाच असणारा चालक दिनेश घबाड रा. काळेवाडी पिपंरीचिंचवड पुणे हा व एस टी मधील प्रवासी विनायक साटम हे दोघे गंभीर जखमी झाले असून टेम्पो ट्रॅव्हल्स चालक याला पुणे येथे हलविण्यात आलं आहे तर एस टी चालक याला पुढील उपचारासाठी मुबंई येथे हळविण्यात आला आहे.तर एस टी मध्ये असणारे सहा प्रवाशी यांना माणगांव येथील उप जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आला आहे.

या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात समजतात माणगांव पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार रावसाहेब कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व झालेल्या अपघातात झालेले जखमी प्रवाशी यांना माणगांव उपजिल्हा रुग्णालय येथे हळविले. असून सदर अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून माणगांव पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास माणगांव पोलीस हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here