जो बायडेन यांच्या युक्रेन-पोलंड दौऱ्यामुळे रशिया-युक्रेन संघर्ष आणखी चिघळणार
रमेश कृष्णराव लांजेवार (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९
जो बायडेन यांनी युक्रेन-पोलंड दौऱ्या दरम्यान रशियाला भडकविण्याचे काम करून आगीत तेल ओतले आहे.तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकासह नाटो देशांशी दोन-दोन हात करण्याची संपूर्ण तयारी दर्शवली.त्यामुळे विनाशकारी विपरीत बुद्धी अशी परिस्थिती होत असल्याचे दिसून येते.गेल्या एकवर्षभरात रशिया-युक्रेन युध्दात ३ लाख पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तरीही रशिया म्हणतो की आम्ही खुन-खराबा चाहत नाही.परंतु संघर्ष सुरूच आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
रशिया-युक्रेन युध्दाला एक वर्ष होवूनही अमेरिका व रशिया हे दोन्ही बलाढ्य देश एकही पाऊल मागे हटायला तयार नाही.त्यामुळे येणारा काळ जगावर अत्यंत भारी पडु शकतो.जगात एकीकडे भुकंपाने सावट आहेच,तर दुसरीकडे जगावर युद्धजन्य परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचे बादल मंडरावतांना दिसत आहे.त्यामुळे एकंदरीत जग विनाशाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट दिसून येते.याला वेळीच रोखले नाही तर विनाश अटळ आहे हेही कटुसत्य आहे याला नाकारता येत नाही.युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण झाली आहे.याच पार्षभुमिवर जो बायडन अचानक सोमवारला युक्रेनची राजधानी कीव्हला पोहोचले.या दौऱ्यात बायडेन यांनी रशियाला कठोर संदेश दिला.यानंतर दिनांक २१ फेब्रुवारीला रोज मंगळवारला पोलंडला भेट दिली. पोलंडमध्ये संबोधन करतांना बायडेनने युक्रेनला संपूर्ण मदत व अत्याधुनिक हतियार देण्याचे जाहीर केले हेही सांगितले की नाटो युक्रेनच्या पाठीशी सदैव उभा राहिल अशी ग्वाही युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना दिली.तेव्हा पासुन रशिया -युक्रेन-अमेरीका यांच्यातील संघर्षची ठीणगी आणखी तीव्र होवू शकते याला नाकारता येत नाही.याच पार्षभुमिवर रशिया आगबबुला झाल्याचे दिसून येते.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अमेरिकेला इशारा दिला की अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने झालेल्या करारातील आपला सहभाग थांबवत असल्याची घोषणा करून अमेरिकेने अण्वस्त्र चाचणी केली,तर रशियाही मागे रहाणार नाही ही बाब अमेरिकेने लक्षात ठेवावी.युक्रेनमधील युध्दाला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना म्हटले की रशिया अद्याप या करारातून पूर्णपणे माघार घेत नाही.अमेरिकेने पुन्हा अण्वस्त्रांच्या चाचण्या सुरू केल्यास रशियाही तशी तयारी ठेवेल.
पुतिनने आपल्या भाषणात अमेरिका व नाटो देशांना सुनावतांना म्हणाले की रशिया-युक्रेन संघर्षात तेल टाकण्याचे काम पाश्चात्यदेश करीत आहे त्यामुळेच हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे व युक्रेन युद्धाला पाश्चात्य देशच जबाबदार आहेत.रशियाने युक्रेन मधील सैन्य मागे घेण्याचे आंतरराष्ट्रीय आव्हान फेटाळले व रशिया सर्वच आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यास सदैव तयार असल्याचे पुतिनने सांगितले.पुतिन म्हणाले की पाश्चात्य देशांना माहीत आहे की रशियाला युद्धभूमीवर पराभूत करणे अशक्य आहे आणि आमचे सुरू असलेले युद्ध योग्यच आहे.रशिया-युक्रेन युध्दाला एक वर्ष पूर्ण होत असताना प्रत्येक बलाढ्य देश एकामेकांवर ताशेरे ओढतांना दिसत आहे.चीन म्हणतो की रशिया-युक्रेन संघर्ष संपविण्यासाठी आमचा देश भुमिका बजावु इच्छीतो.परंतु पाश्चिमात्य देशांनी (अमेरिका+नाटो) युध्दाच्या आगीत तेल ओतण्याचे काम करू नये असे मत चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गॅंग यांनी व्यक्त केले.यावरून स्पष्ट होते की युक्रेन-रशियाची संघर्षाची ठिणगी आणखी तीव्र होवून तिसऱ्या महायुद्धाचे रूप धारण करू शकते याला नाकारता येत नाही.कारण युक्रेनच्या बाबतीत अमेरिका-रशिया दोघेही एकमेकांना खुली धमकी देत आहे यामुळे रशिया -युक्रेन युद्ध पुन्हा विक्राळ रूप धारण करून चिघळु शकते.
रशियाचा अमेरिकेवर सरळ आरोप आहे की पाश्चिमात्य देशांनीच युक्रेनला युध्दाच्या खाईत लोटले.कारण अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या युक्रेन भेटीच्या दुसऱ्या दिवशी व्लादिमीर पुतिन यांनी देशाला संबोधित केले.रशियन संसद क्रेमलिनमध्ये बोलतांना व्लादिमीर पुतिन म्हणाले की आम्ही युद्ध हा शेवटचा पर्याय मानतो.त्यामुळे पाश्चिमात्य देशांनीच युक्रेन युद्ध भडकवीले त्यांचे प्रायश्चित्त त्यांना भोगावेच लागेल अशाप्रकारे संतापजनक वक्तव्य पुतिन यांनी केले.सध्याच्या परिस्थितीत जो बायडेन यांच्या युक्रेन-पोलंडच्या भेटीने झेलेन्स्की यांचे होसले बुलंद झाले असल्याचे दिसून येते.कारण झेलेन्स्कीच्या कार्याची बायडेन यांनी खुप तारीफ केली.जो बायडेन ने झेलेन्स्कीची शब्दानेच मदत केली नाही तर 50 कोटी डॉलरची मदतही जाहीर केली ही मदत पाच हजार कोटी डॉलरच्या व्यतिरिक्त असल्याचे जाहीर केले. तोफगोळे,रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे,रडार आणि इतर अत्याधुनिक उपकरणांच्या स्वरूपात ही मदत असेल असे जाहीर केले.असेही म्हणता येईल की अमेरिकेने
युक्रेनच्या बाबतीत रशियाला खुली चुनौती दिल्याचे दिसून येते.कारण जो बायडेन युक्रेन-पोलंड भेटीच्या दरम्यान म्हणतात की युक्रेनला पाठिंबा देण्याच्या मुद्यावर आमच्या मनात कोणताही किंतु-परंतु अजीबात नाही.हे अमेरिकेने युक्रेन भेटीच्या निमित्याने दाखवून दिले.यावरून स्पष्ट होते की बायडेन यांची भुमिका आक्रमक असल्याचे दिसून येते.त्यामुळे युद्ध थांबण्याची चिन्हे अजीबात दिसत नाही.उलट युक्रेन-रशिया संघर्ष तिसऱ्या महायुद्धाची वाटचाल करीत असल्याचे दिसून येते,हेही तीतकेच सत्य आहे की एक वर्षापूर्वी युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाच्या सैनिकांनी हल्ला केला.तेव्हा पश्चिमी देशांच्या नेत्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या जीवाची भीती वाटु लागली.त्यामुळे त्यांना देश सोडून जाण्याचा सल्ला दिला.एवढेच नाही तर अमेरिकेने देखील त्यांना पळून जाण्याचाच मार्ग सांगितला.मात्र झेलेन्स्कीने देश सोडून जाण्याऐवजी संघर्ष करण्याचा निर्धार केला.यातही झेलेन्स्की यांची महानता व देश प्रेम दिसून येते.त्यामुळेच आज झेलेन्स्कीची तुलना विस्टन चर्चिल यांच्याशी तज्ज्ञ ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूट, रशियाच्या फियोना हिल यांनी केली आहे.अमेरिका-रशिया-युक्रेन संघर्ष रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करावा व भारताच्या मदतीने हा संघर्ष ताबडतोब थांबवावा यातच जगाचे व मानव जातीचे कल्याण आहे.सध्या जगाला युध्दाची गरज नसुन पृथ्वी, जीवसृष्टी व मानवजातीला वाचविण्याची गरज आहे यातच सर्वांचे कल्याण होईल.