ब्रम्हपुरी विधानसभेत ही ऊ.बा.टा व मनसे ला “दे धक्का“
प्रा.अनुकूल शेंडे, मिलिंद भणारे व संजय पारडवार यांचा शिवसेनेत प्रवेश.
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक ✍🏻
मो 9860020016
ब्रम्हपुरी :- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख प्रा अनुकूल शेंडे, उपजिल्हा प्रमुख मा मिलिंद भणारे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे उपजिल्हा प्रमुख डॉ संजय पारडवार यांनी आज शिवसेनेत प्रवेश घेतला. त्या प्रसंगी मा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा शिवसेना नेते ,चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख मा किशोर रॉय साहेब, पूर्व विदर्भ संघटक मा किरण पांडव, जिल्हा प्रमुख मा बंडूभाऊ हजारे यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न पडला त्या वेळी शिवसेना तालुका प्रमुख मा नरेंद्र नरड, शहर प्रमुख अमोल माकोडे, युवा सेना तालुका प्रमुख मा आकाश शेंद्रे व शिवसैनिक उपस्थित होते. आज अचानक त्यांनी नागपूर गाठत थेट पक्ष बदलला असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यांच्या प्रवेशाने सर्व कार्यकर्ते पक्ष संघटने साठी भरपूर सहयोग करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या शिवसेना प्रवेशाने ठाकरे गटाला व मनसेला मोठा धक्का बसला. त्यामुळे याचा फायदा नक्की स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत होईत असा बोलल्या जात आहे.