मुलगी दिली नाही म्हणून त्याने 5 मुलामुलींसह 4 नातवंडाचा आईलाच पटवलं आणि पळवून नेल.
✒️धुळे जिल्हा प्रतिनिधी✒️
धुळे,दि.23 मार्च:- प्रेम हे आंधळ असते. ते वय जात याच्या पलीकडे असते अस बोलल जाते. प्रेमापोटी एखादी व्यक्ती कोणत्या स्तरावर जाऊ शकतात हे आपल्याला माहितीच आहे. तर एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरणे आपण दररोज वाचत असतो. धुळ्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरूणाने मुलगी देत नाही म्हणून चक्क तिच्या आईलाच पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे त्यांच्या परिवारातील सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
काही दिवसांपुर्वी एक तरूण मुलगी बघायला मुलीच्या घरी गेला. त्याला मुलगी आवडली परंतू तिच्या घरच्यांनी या स्थळाला नकार कळवला. हा नकार न पचल्यानं तरूणांन मुलीच्या घरच्यांना चाकूचा धाक दाखवत मुलीच्या आईलाच पळवून नेईल अशी धमकी दिली. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी त्यांला लग्नासाठी नकार दिला होता.
तरूणानं तिच्या आईशी फोनवर बोलणं चालू ठेवलं त्यानंतर तरूणानं मुलीच्या आईलाच फूस लावुन पळवून घेऊन गेला. तिचा पती घरी आल्यावर मुलीची आई त्यांना दिसली नाही. त्यांनी तिला फोन लावल्यावर मुलीच्या आईने पुन्हा घरी येण्यास नकार दिला आणि आम्ही दोघं लग्न करणार असल्याचं तिच्या पतीला तिनं सांगितलं.
दरम्यान, पळून गेलेल्या मुलीच्या आईचं वय 41 वर्ष आहे. तर तिला 5 मुलामुलींसह 4 नातवंड देखील आहेत. तिच्या लग्नाला 25 वर्ष देखील पुर्ण झाली आहेत. मुलीच्या आईने केलेल्या प्रकारामुळे तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.