आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा तालुक्यात ५० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन

60

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा तालुक्यात ५० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन.

Bhumi Pujan of development works worth Rs 50 lakh in Rajura taluka at the hands of MLA Subhash Dhote

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा:- आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुक्यात ५० लाखाच्या विकसकामांचे भुमीपुजन करण्यात आले. यात सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चंद्रपूरचा २५१५ ग्रामविकास निधी अंतर्गत मौजा आर्वी येथील अंगणवाडी क्र. १ ते साळवे यांच्या घरापर्यंतचा अंदाजित किंमत १० लक्ष रुपये सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे, मौजा खामोना येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे किंमत १०.०० लक्ष, मौजा पांढरपौनी येथे अंतर्गत रस्ता बांधकाम करणे किंमत १५.०० लक्ष, मौजा नाईकनगर येथील मेनरोड ते नाईक नाईक रस्त्याचे खडकरण व डांबरीकरनाचे बांधकाम करणे. किंमत १५.०० लक्ष रुपये या कामांचा समावेश आहे.

या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरणुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जि प सदस्य डॉ नामदेवराव करमनकर, प स सदस्य रामदास पुसाम, आर्वी येथे शालुताई लांडे सरपंच, सुभाष काटवले उपसरपंच, आर्वी येथील ग्राम पंचायत सदस्य उषा उपरे सुरेख रामटेके, सूर्वणा महाकुलकर, वंदना मुसळे, ताने कोहपरे, बंडू आईलवार, मारोती महाकुलकर, भास्कर डोंगे, खामोना येथील हरिदास झाडे सरपंच, कवडू सातपुते माजी सरपंच, लहू चाहरे माजी सरपंच, शारद तलांडे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई लोणारे, अल्का वैद्य, सोनी ठक, मारोती चन्ने, ग्रामसेवक मिलिंद देवगडे, पांढरपौनी येथील आनंदराव लांडे जेष्ठ समजसेवक, बाबुराव लांडे माजी सभापती, महादेव आत्राम सरपंच, सुधीर लांडे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य शंकर घोटेकर, शंकुतला काले, अरुणा उमारे, पर्वता सोयाम, विमल मडावी, लीलाबाई आत्राम, मुर्लीधर आत्राम यासह गावकरी उपस्थित होते.