Demolish the unauthorized figure center point building and clear the amusement ground for baby gopals.
Demolish the unauthorized figure center point building and clear the amusement ground for baby gopals.

अनाधिकृत आकृती सेंटर पॉईंट इमारत पाडून बाळ गोपालांसाठी करमणुकीचे मैदान मोकळे करा.

डेमोक्रॅटिक आरपीआय च्या .डॉ. राजन माकणीकर यांची मागणी.

 Demolish the unauthorized figure center point building and clear the amusement ground for baby gopals.

मुंबई दि.23 (प्रतिनिधी):-  अंधेरी एमआयडीसी सेंट्रल रोडवरील आकृती सेंटर पॉईंट इमारत तोडून नियोजित बाळ गोपालांसाठी असलेले करमनूकीचे मैदान मोकळे करा अन्यथा सेंटर पॉइंटचा ताबा घेऊ. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

विकासक विमल शहा व महादलाल मुरजी पटेल स्वतःला फार मोठे चतुर समजत असून राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे आमचे कोनि काहीही करू शकत नाही अश्या अविर्भावात प्रकल्पात चोरी करत असून १० हजार हजार करोड रुपयांचा भ्रष्टाचार यात झाला असल्याचे मत डॉ. राजन माकनीकर यांनी मांडले आहे.

नियमानुसार ८% जागा ही करमणुकीच्या मैदानासाठी द्यायची असतांना आकृती हब टाऊन विकासक व महादलाल मुरजी पटेल यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून खेळाचे मैदानाची जागा गिलंकृत केली आहे.

सदरची जागा मैदान स्वरूपात देण्याऐवजी दोन इमारतीत सामायिक अंतराच्या तुकड्या तुकड्यात देऊन खेळाच्या मैदानाचा भाग चोरला आहे. या अश्या चोर महाठका वर कारवाई होणे महत्वाचे असल्याचे मत डॉ माकणीकर व राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड व्यक्त केले.

पॉकेट क्रमांक ४ म्हणजेच गौतम नगर येथील करमणूक खेळाच्या मैदानाचा वापर विकासक विमल शहा याने आकृती सेंटर पॉईंट या व्यवसाईक इमारतीत व त्याच्या इफएसआय मध्ये केला आहे. ही इमारत तात्काळ तोडून परिसरातील नागरिकांना मैदान मोकळे करून देण्याचे आदेश एमआयडीसी च्या वतीने संबंधितांना देण्यात यावेत अशी तक्रार डॉ. माकणीकर यांनी केली आहे.

खेळाच्या मैदानामुळे परिसरातील जेष्ठ नागरिकांचे आरोग्य उत्तम राहते, मैदानी खेळा मुळेच बाळ गोपालांच्या आरोग्याला व जीवनाला नवसंजीवनी प्राप्त होते व खेळामुळेच इतर गुणांचाही विकास होतो, ज्या देशातील बाळ गोपाळ मैदानी खेळ खेळत नाही त्या देशाची पिछेहाट होते.

या अतिमहत्त्वाच्या गोष्टीचा विसर विकासका सह तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांना पडला असेल? त्यामुळे तत्कालीन एमआयडीसी अधिकारी, विकासक विमल शहा व त्याचा साथीदार महादलाल मुरजी पटेल यांची वंशावळी संपत्ती ची चौकशी होऊन फसवणूक व प्रकल्पात चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी रिपाई डेमोक्रॅटिक च्या वतीने डॉ. राजन माकणीकर व श्रावण गायकवाड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here