From April 1, 2021, old checkbooks, passbooks and (IFSC) codes of customers of 8 banks will become invalid.
From April 1, 2021, old checkbooks, passbooks and (IFSC) codes of customers of 8 banks will become invalid.

1 एप्रिल 2021 पासून 8 बँकांच्या ग्राहकांचे जुने चेकबुक, पासबुक आणि (IFSC) कोड अवैध होतील.

From April 1, 2021, old checkbooks, passbooks and (IFSC) codes of customers of 8 banks will become invalid.

नीलम खरात प्रतिनिधी✒
मुंबई,दि.23 मार्च:- बँकेच्या ग्राहकांसाठी ही खूपच महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून या 8 बँकांच्या ग्राहकांचे जुने चेकबुक, पासबुकआणि इंडियन फाइनॅशिंयल सर्व्हिस कोड (IFSC) इनव्हॅलिड होतील. म्हणजे 1 एप्रिलपासून या ग्राहकांच्या जुन्या चेकबुकचा काहीच उपयोग होणार नाही. बँकेच्या चेकद्वारे व्यवहार करणं बंद होईल. या 8 बँका अलीकडेच दुसऱ्या मोठ्या बँकांमध्ये विलीन झाल्या आहे.बँकांच्या विलीनीकरणामुळं खातेधारकांचा खातेक्रमांक, आयएफएससी आणि एमआयसीआर कोडमध्ये बदल झाल्यामुळं 1 एप्रिल 2021 पासून बँकिंग सिस्टिम जुन्या चेकला रिजेक्ट करेल. या बँकांचे सर्व चेकबुक अवैध राहतील. त्यामुळं या सर्व बँकांच्या ग्राहकांना सल्ला देण्यात आला आहे की तातडीने आपल्या बँकेच्या शाखेत जा आणि नवीन चेकबुक घ्या.

केंद्र सरकारने काही बँकांचे विलीनीकरण केले आहे. बँकांच्या वाढत्या एनपीएच्या (NPA) ओझ्यामुळे केंद्र सरकारनं बँकांचं विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला. विलीनीकरणानंतर बँकांचे चेकबुक, पासबुक, आयएफएससी कोड देखील बदलणार आहेत. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत 1 एप्रिल 2021च्या आधी नवीन चेक बुक घ्यावे लागणार आहे.दरम्यान, सिंडिकेट आणि कॅनरा बँकांनी ग्राहकांना थोडासा दिलासा दिला आहे. सिंडिकेट बँकेचं जुनं चेकबुक वापरण्यास 30 जून 2021पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर ग्राहकांना नवीन चेकबुक घ्यावे लागेल. ज्या बँकांचे जुने चेकबुक 1 एप्रिलपासून इनव्हॅलिड होणार आहेत त्यामध्ये देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनाइटेड बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकमध्ये विलीनीकरण झाले आहे. सिंडिकेट बँकेचे, कॅनरा बँकेत विलीनीरण झाले आहे. आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे  युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनकरण झाले आहे. अलाहाबाद बँकेचे, इंडियन बँकेत  विलीनीकरण झाले आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आले आहे.

बँकेमध्ये सेव्हिंग अकाऊंट आणि करंट अकाऊंट सुरू करताना बँक आपल्या ग्राहकांना चेकबुक देते. या चेकबुकच्या मदतीने ग्राहक पैशांचा व्यवहार करु शकतात. चेकबुक आणि त्याच्या पानावर बरीच माहिती असते. त्यावर आयएफएससी, मॅग्नेटिक इंक करेक्टर रेकग्निशन (MICR) कोड असतो. आज बरीच कामं या कोडच्या मदतीनेच होतात. आपल्याकडे असलेल्या जुन्या चेकबुकवर जुन्या बँकेचा आयएफएससी आणि एमआयसीआर कोड असतो. हे कोड आता बदलले आहेत. त्यामुळे तुम्हाला जुन्या चेकबुकवर व्यवहार करता येणार नाही. तुम्ही जर आताच नव्या चेकबुकसाठी अर्ज केला तर तुम्हाला 10 दिवसांमध्ये नवीन चेकबुक मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here