In Maharashtra, 24,645 new corona patients, 58 corona infected patients died in the last 24 hours.
In Maharashtra, 24,645 new corona patients, 58 corona infected patients died in the last 24 hours.

महाराष्ट्रात माघिल 24 तासांत 24,645 नवे कोरोना रुग्ण, 58 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूं.

 In Maharashtra, 24,645 new corona patients, 58 corona infected patients died in the last 24 hours.

✒नीलम खरात प्रतिनिधी✒
मुंबई,दि.23 मार्च:- महाराष्ट्रात कोरोना वायरस बांधीत रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामूळे प्रशासनाची झोप उडाली आहे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या आकड्यात भर पडत असली तरी कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये घट झाल्याची चांगली बाब आहे.

महाराष्ट्र राज्यात माघील 24 तासात 24,645 नवीन कोरोना वायरस बांधीत रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 25,04,327 झाली आहे. महाराष्ट्रात आता 2,15,241 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज 58 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, आता पर्यंत कोरोना वायरसने मृत झालेल्याची संख्या 53,457 वर पोहोचली आहे.

सध्या महाराष्ट्रात मृत्यूदर 2.13 टक्के एवढा आहे. राज्यात आज 58 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई 10, नाशिक 06, पिंपरी-चिंचवड 04, औरंगाबाद 03, नांदेड 05, अमरावती 04, नागपूर 12 यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण 58 मृत्यूंपैकी 44 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 06 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 08 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 08 मृत्यू पुणे 02, औरंगाबाद 02, गोंदिया 02, ठाणे 01 आणि नांदेड 01 असे आहेत.

माघील 24 तासात महाराष्ट्रात 19,463 कोरोना वायरस बांधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यात आजपर्यंत एकूण 22,34,330 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.22 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,84,62,030 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 25,04,327 (13.53 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10,63,077 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 11,092 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here