लग्नाचे आमिष तरुणीवर बलात्कार; गर्भपात करताना तरुणीचा मृत्यू.

63

लग्नाचे आमिष तरुणीवर बलात्कार; गर्भपात करताना तरुणीचा मृत्यू.

Lure of marriage rapes young woman; Death of a young woman during an abortion.

✒कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी✒
कोल्हापुर,दि.23 मार्च- जिल्हातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी गाव, कोलेवाडी, येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सतत बलात्कार केला. त्यानंतर तिचा अशास्त्रीय पद्धतीने गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. गर्भपात करताना तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना 12 मार्च 2021 रोजी मेनरोड काळेवाडी येथे घडली.

याबाबत मयत तरुणीच्या वडिलांनी रविवारी दि. 21 वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकास वसंत मोहिते रा. सेनापती कापशी गाव, कोलेवाडी, ता. कागल, जि. कोल्हापूर याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती केले. त्यानंतर मुलीच्या संमतीशिवाय काहीतरी खाण्यास देऊन अशास्त्रीय पद्धतीने तिचा गर्भस्राव घडवून आणला. मात्र, गर्भस्राव होत असताना फिर्यादी यांच्या मुलीचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.