Two more days of hail, wind and rain crisis in Maharashtra.
Two more days of hail, wind and rain crisis in Maharashtra.

महाराष्ट्रात आणखी दोन दिवस गारपीट, वादळी वा-यासह पावसाचे संकट.

Two more days of hail, wind and rain crisis in Maharashtra.

✒️प्रशांत जगताप कार्यकारी संपादक✒️
नागपुर:– हवेची चक्रीय स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्राच्या काही जिल्हात वादळ वा-यासह गारपीट पाऊस सुरु आहे. अशीच स्थिती आणखी दोन दिवस महाराष्ट्रात कायम राहणार आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 3 दिवसा पासून विदर्भातील काही जिल्हात विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

वर्धा, नागपुर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपुर अकोल्यात जिल्हात पाऊसाच्या जोरदार सरी बरसल्या. अरबी समुद्रातून सध्या उत्तर-पश्चिम भारतात बाष्पाचा पुरवठा होत असल्यानं या भागात पाऊस होतोय. महाराष्ट्रात हवेची चक्रीय स्थिती आहे. त्याचप्रमाणे सध्या कर्नाटकच्या किनाऱ्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. याच स्थितीमुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाऊस आहे. मराठवाडा आणि विदर्भात या दरम्यान गारपीटही झाली. कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असले, तरी राज्यात आणखी दोन दिवस पावसाचे सावट राहणार आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 मार्चला असे हवामान असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चक्रीवादळ, गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. तसेच हलका स्वरुपाचा पाऊस पडरण्याची शक्यता आहे.

विदर्भातील काही जिल्हात सकाळ पासुन विजांच्या कडकडासह जोरदार अवकाळी पावसाला सुरवात झालीय. सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यात आज पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली असून शेतकरी मात्र अडचणीत सापडलाय. अजूनही काही भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. तर, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांच्या गारपिट आणि पावसामुळे शेती पिकांचे काही अंशी नुकसान झालं आहे. ज्यात गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचे काही अंशी नुकसान झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here