राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ

प्रफुल मदनकार

मो: 7972220490

यामुळे जवळपास १ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहे.याचा फटका शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात बसला आहे.यामुळे शेतकरी संपूर्ण हवालदिल झाला आहे.याला मनुष्य जवाबदार आहे.कारण स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी तो निसर्गाचे संवर्धन व संरक्षण करण्यास विसरला आहे.

जंगलतोड,प्रदूषण,रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर,सुसाट कीटकनाशकांचा उपयोग,वाढती लोकसंख्या,जल प्रदूषण,पंच महाभूत प्रदूषित करणे,झाडे न लावता मला त्यातून काय मिळेल ही भावना ठेवणे.अश्या बऱ्याच कारणामुळे शेतकरीच नाहीत संपूर्ण जगाला याचा फटका येत्या काळात बसणार आहेत.आणि हे शास्वत सत्य आहे.म्हणून यातून आपल्या सर्वांना बोध घेण्याची गरज आहेत.

निसर्गाला जपणे,त्यांचे संरक्षण करणे हाच एकमेव मार्ग आपल्याकडे आहेत.म्हणून सर्वांनी वेळेवर सावध होवून पर्यावरणासाठी एकत्र येवून काम करण्याची गरज आहेत.झाडे लावा,झाडे जगवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here