साई ग्रामपंचायत बौद्ध समाजाच्या जागेमध्ये अंगणवाडीचे बांधकाम अनाधिकृत करित असून सरपंच यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष

साई ग्रामपंचायत बौद्ध समाजाच्या जागेमध्ये अंगणवाडीचे बांधकाम अनाधिकृत करित असून सरपंच यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष

साई ग्रामपंचायत बौद्ध समाजाच्या जागेमध्ये अंगणवाडीचे बांधकाम अनाधिकृत करित असून सरपंच यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-साई बौद्ध समाजाच्या नावे गावठानी जागा असून या जागेवर साई ग्रामपंचायती कडून अंगणवाडीचे अनाधिकृत पणे बांधकाम सुरु केले आहे. ग्रामपंचायत सरपंच या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत.साई बौद्धवाडी येथे साई बौद्ध विकास ग्रामस्थ व मुंबई मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ या गावच्या असलेल्या बौद्ध समाजाच्या नावाने असलेल्या जागेवर जबरदस्तीने गावातील लोकांची परवानगी न घेता अतिक्रमण करून अनाधिकृत पणे बांधकाम करीत आहेत.

यावेळी ग्रामस्थांनी बौद्धावाडीच्या जागेत होत असलेल्या अंगणवाडीचे काम बंद करणेबाबत साई ग्रामपंचायती कडे 15 व 19 जानेवारी 2024 रोजी पत्र देण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग यांना 19 जानेवारी 2024, गटविकास अधिकारी पंचायत समिती माणगांव यांना 19 जानेवारी 2024 रोजी पत्र देण्यात आले. तरी सुद्धा हे माणगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अभियंता व सरपंच काम बंद करीत नाही.अभियंता बारापत्रे यांना सदरचे बांधकाम बंद करण्याचे असताना तुम्ही मोजमाप का घेता तर त्यांनी संगितले की, मुख्य कार्यकारी अलिबाग यांनी काम करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये शासकीय अधिकारी सुद्धा सामील असल्याचे दिसून येत आहे.सदरची अंगणवाडी ही बौद्धावाडीसाठी नसून साई मराठी अशा नावाने आहे. परंतु तिचे बांधकाम साई बौद्धावाडीच्या जागेत होत असून गावचे ग्रामस्थ, येथील ग्रामस्थ मुंबई यांनी कामाला विरोध करून सुद्धा काम करीत आहेत.

ग्रामस्थ पाठपुरावा करत असल्यामुळे माणगांव पंचायत समिती कडून 5 फेब्रुवारी 2024 रोजी काम बंद करण्याचे पत्र ग्रामपंचायती कडे आले असताना सुद्धा या पत्राला सरपंच यांनी केराची टोपली दाखवली आहे..या अंगणवाडीचे बांधकाम सुरुवात करीत असताना गावातील पदाधिकारी यांनी या कामा बाबत विचारणा केली असता त्या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामपंचायत उपसरपंच व त्यांचे सोबती यांनी पदाधिकारी यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्या संबधित माणगांव पोलीस ठाण्यात 19 जानेवारी रोजी तक्रार करण्यात आली. त्याबाबत चौकशी सुद्धा करण्यात आलेली दिसून येत नाही. तरी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व माणगांव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी लक्ष देऊन सदरच्या अंगणवाडीचे काम बंद करावे व पुढील अनर्थ टाळावा अशी साई बौद्धावाडीतील ग्रामस्थ यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here