तिरोडा पोलिसांची कारवाई

तिरोडा पोलिसांची कारवाई

तिरोडा पोलिसांची कारवाई

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558

गोंदिया -तिरोडा
पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा श्री. साहिल झरकर यांनी आगामी काळातील निवणुडकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे करणारांवर हद्दपार कारवाई करण्याचे निर्देश होते..
या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे
*1) सूरज प्रकाश बरियेकर,रा.संत रविदास वॉर्ड तिरोडा*
*2) नितीन मोहन देशमुख रा.लाखेगाव.ता तीरोडा*
*3) निलेश सुभाष कराडे रा.काचेवाणी, ता.तिरोडा,*
*4) अखिल रहीम खान पठाण रा.संत रविदास वॉर्ड, तिरोडा* हे तिरोडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार दारू विक्रीचे व जुगाराचे गुन्हे करत होते त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईचा काहीही परिणाम होत नव्हता म्हणून तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. देवीदास कठाळे यांनी उपरोक्त अवैध धंदे करणारे यांना गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करणे बाबतचे प्रस्ताव पाठविले होते. ते प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा कु. पुजा गायकवाड मॅडम यांनी मंजूर केले आहेत.
*जाब देणारा 1) सूरज प्रकाश बरियेकर,रा.संत रविदास वॉर्ड तिरोडा. 2) नितीन मोहन देशमुख रा.लखेगाव.ता तीरोडा 3) निलेश सुभाष कराडे रा.काचेवणी ता.तिरोदा 4) अखिल रहीम खान पठाण रा.संत रविदास वॉर्ड* यांना नोटीस तामील केले दिनांक पासून 30 दिवसांपर्यंत गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. सर्व जाब देणार यांना नोटीस तामील करून त्या सर्वांना भंडारा जिल्ह्यात त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी नातेवाईकांच्या घरी राहणार असल्याचे कळविल्याने त्या त्या पोलीस स्टेशन अंतर्गत स्टाफसह रवाना केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here