अधिकारी व कर्मचारी वर्गांकरिता पोषण आहार विषयावर व्याख्यान.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- सामाजिक वनीकरण विभाग अलिबाग येथील विभागीय वन अधिकारी रायगड स्वप्निल घुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी महिला अधिकारी व कर्मचारी वर्गाला पोषण आहाराचे महत्व त्याचे सेवन कसे करावे, व त्यामुळे शरीरावरील व मनावरील होणारे सात्विक परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली.
आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा यायची असेल तर योग्य तो आहार सेवन करावा तसेच मनावर येणारा ताण कमी कसा करता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
आजारी पडून औषधोपचार घेण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून पौष्टिक आहार सेवन, व उत्तम विहार असावा असे डॉ. राजाराम हुलवान यांनी सांगितले.
उज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी महिलांचे व्यवसाय प्रशिक्षण बद्दल माहिती दिली व त्यांच्या समस्या जाणून त्यावर योग्य ते मार्गदर्शन केले तसेच महिला कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय करून आपले घर चालवले पाहिजे व संरक्षणाचे धडे घेऊन कायम फिट राहिले पाहिजे असे सांगितले
या कार्यक्रमास सहाय्यक वनसंरक्षक रायगड गायत्री पाटील मुख्य लेखापाल संगीता काळे, वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड, संतोष साळुंखे, गौरी कोळेकर, महादेव नाईक, रामदास रोगे, राम परब व इतर महिला कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते.
विभागीय वन अधिकारी स्वप्नील घुरे यांनी महिलांनी स्वतःची काळजी घेत सर्वांनी एकत्र काम करून सतत आनंदी राहन्याचा सल्ला दिला.
प्रसाद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले.
गायत्री पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.