घोटवडे शाळेत शहाजीराजे भोसले जयंती उत्सव साजरा
विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील आंदोशी केंद्रातील रायगड जिल्हा परिषद शाळा घोटवडे येथे शहाजीराजे भोसले जयंती निमित्त दिनांक 18/3/ 2025 रोजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले .
शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जोश पूर्ण आकर्षक नृत्य नाटिका सादर केले .
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर पूर्वा पाटील अधिव्याख्यात्या जिल्हा रुग्णालय अलिबाग यांनी केले तर सरस्वती पूजन अंदोशी केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय कृष्णकुमार शेळके सर यांनी केले.यावेळी
डॉक्टर पूर्वा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर . शेळके सरांनी विद्यार्थ्यांना फार मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेतील कार्य तत्पर शिक्षक विनायक भोनकर यांनी आपल्या रसाळ वाणीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
कार्यक्रमाला माजी केंद्रप्रमुख मा . विनायक थळकर माजी मुख्याध्यापक काटकर ,प्रकाश खडपे चेअरमन बेलोशी हायस्कूल ,शिक्षक भारतीचे अध्यक्ष निलेश तुरे , बळीराम पाटील ,कंठक सर,सुडकू ,सौ .संध्या पाटील व सौ सुशीला सांदणकर ,अमृता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
निपुण भारत अभियान अंतर्गत शारीरिक व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी व मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .रश्मी शिवलकर यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ मंडळ व पंचमंडळी घोटवडे शाळा व्यवस्थापन समिती घोटवडे या सर्वांनी फार मोलाचे सहकार्य केले .
दत्ताभाऊ ठाकूर माजी सरपंच बेलोशी यांनी स्टेज ,स्पीकर व प्रकाश योजना व्यवस्था केली. जगदीश ठाकुर अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ , सौ .उज्वला सांदणकर ,उदय सांदणकर , सौ सौम्या ठाकूर,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,उपाध्यक्ष आशिष नाईक शाळा व्यवस्थापन समिती ,सदस्य प्रवीण मोरे, प्रदीप नाईक , अजित ठाकूर दीपक थळे, संतोष, खंडागळे, रवींद्र शिंदे, नरेश ठाकूर भास्कर थळे , रविंद्र खंडागळे ,नारायण सांदणकर ,मोहन थळे, संजय पाटील , बंडू थळे ,अनिल नाईक तसेच प्रमोद सांदणकर सचिव ग्रामस्थ मंडळ घोटवडे, संतोष गावडे ,सुरेश भोईर, नितीन खंडागळे, जगदीश खंडागळे, नारायण भोईर, मिलिंद शिंदे, दिलीप शिंदे, प्रदीप खंडागळे, उमेश लोहार ,हरेश ठाकूर, मधुकर ठाकूर, निलेश थळे ,प्रकाश पाटील ,सौ . मधुमती ठाकूर या सर्वांनी कार्यक्रमासाठी फार मोलाचे सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी केला