दवाखान्यात आठ ते नऊ महिन्यापासून डॉक्टर नसल्याने ताबडतोब डॉ पाठवण्यात यावे
त्रिशा राऊत क्राइम रिपोर्टर नागपुर
मो 9096817953
भिवापुर . दि.23,3,2025 रोजी रविवारला कुटुंब कल्याण आरोग्य विभाग नागपूर येथे माननीय श्री प्रकाश जी आंबिटकर साहेब सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन भिवापूर येथील आपला दवाखान्यात आठ ते नऊ महिन्यापासून डॉक्टर नसल्याची माहिती देण्यात आली व त्या ठिकाणी लवकरात लवकर नवीन डॉक्टर पाठवण्यात यावे ही लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले तसेच भिवापूर शहरी व ग्रामीण भागातील गरोदर मातेची मागील तीन वर्षापासून त्यांना अनुदान मिळालेला नाही आपण माझ्या अर्जावर लक्ष वेध करून गरोदर मातेला अनुदान देण्यात यावी ही विनंती केली
निवेदन देत्या वेळेस उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप जी ईकटलवार महेश डडमल अभिषेक नान्हे आनंद खडसे चंद्रशेखरजी बावनकुळे तुषार भगत व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते